आयसीसी वनडे विश्वचषक 2023 पूर्वी सराव सामने खेळले जात आहेत. मंगळवारी (3 सप्टेंबर) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 14 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानसाठी बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांनी मोठी खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
उभय संघांतील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 351 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 47.4 षटकांमध्ये 337 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने 59 चेंडूत 90 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्याआधी इफ्तिखार अहमद याने 85 चेंडूत 83 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. त्यासोबत मोहम्मद नवाझ यानेही 42 चेंडूत 50 धावांची खेळी केली. असे असले तरी, ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान संघ 48व्या षटकात सर्वबाद झाला. मार्नस लॅबुशेन याने सर्वाधिक 3, तर स्टीव स्मिथ आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेल यायने 71 चेंडूत 77 धावा केल्या. तसेच कॅमरून ग्रीन यानेही 40 चेंडूत 50 धावा केल्या. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि फिनिशरच्या भूमिकेत खेळताना जोश इग्लिस यांनी प्रत्येकी 48-48 धावांची खेळी केली. पाकिस्तानसाठी उस्मान मिर याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम, शादाप खान आणि मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Australia defeated Pakistan by 14 runs in the Warm Up match)
महत्वाच्या बातम्या –
निर्विवाद वर्चस्वासह ध्यानचंद अकादमी उपांत्यपूर्व फेरीत, गतविजेत्या एसजीपीसी अमृतसर संघाची विजयी सुरुवात
वर्ल्डकपमधील सर्वात लाजिरवाणा विक्रम ‘फलंदाज’ मलिंगाच्या नावे, 4 वर्ल्डकप खेळून 4 वेळा…