भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर (Border Gavaskar Trophy) मालिका खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. पण भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वैयक्तिक कारणांमुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या सामन्यात भारतीय संघाची कमान कोणाकडे असणार या प्रश्नावर सस्पेंस आहे.
मात्र, दरम्यान, पर्थ कसोटीत रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय संघासाठी कार्यक्षम कर्णधार ठरू शकतो, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅन्टिंगने (Ricky Ponting) व्यक्त केला आहे.
जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) यापूर्वी 2022 मध्ये एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते, जेव्हा रोहित कोविड झाल्यामुळे सामना खेळू शकला नव्हता. आता आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये पॉन्टिंग म्हणाला, “कर्णधारपद हे बुमराहसाठी सर्वात कठीण काम असू शकते. ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार झाल्यावर पॅट कमिन्ससाठीही हे नेहमीच आव्हानात्मक राहिले असावे. तो स्वतः किती गोलंदाजी करेल? तो स्वत:ला खूप पर्याय देईल की मर्यादित गोलंदाजी करेल? असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर असतील. पण बुमराह सारख्या अनुभवी खेळाडूला त्याला कधी गोलंदाजी करावी लागते, कधी स्पेलची गरज असते हे समजेलच.”
पुढे बोलताना रिकी पाॅन्टिंग म्हणाला, “असे खेळाडू अतिरिक्त दबाव आणि जबाबदारीसह चांगली कामगिरी करतात. असो, तो बराच काळ या आक्रमकतेचे नेतृत्व करत आहे. लाल बॉल असो, टी20 किंवा वनडे, तो मुख्य खेळाडू आहे.” विराट कोहली (Virat Kohli), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) या अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीचा कर्णधार म्हणून बुमराहला फायदा होईल, असा विश्वासही पाॅन्टिंगने व्यक्त केला आहे.
5 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्रॉफीचं प्रकरण न्यायालयात पोहोचलं! बीसीसीआयविरोधात कोर्टाचं दार ठोठावणार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड?
धोनीच्या संघातून खेळणार पंत? सीएसकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे मोठे वक्तव्य!
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताऐवजी हा देश खेळू शकतो? आयसीसी लवकरच घेणार मोठा निर्णय!