---Advertisement---

भारताचे जोरदार कमबॅक, दुसऱ्या दिवसी सिराजच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे

On: गुरूवार, जून 8, 2023 6:50 PM
Team India (WTC final)
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजीला आला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 121.3 षटकांमध्ये 469 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना पहिल्या दिवशी अपेक्षित सुरुवात मिळाली होती. मात्र, मध्यक्रमात स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी वैयक्तिक शतके ठोकत मोठी भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ 3 बाद 327 धावांपासून पुढे सुरू केला. स्टीव स्मिथ 95* आणि ट्रेविस हेड 146* धावांसह खेळपट्टीवर आले. दोघांनी पहिल्या दिवसी दाखवलेला फॉर्म दुसऱ्या दिवसी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. पण हेडच्या रुपात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवशी पहिली विकेट गमवावी लागली. हेडने 174 चेंडूत 163 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या चेंडूवर स्मिथने आपले 31 वे शतक पूर्ण केले. स्मिथने या सामन्यात एकूण 268 चेंडूंचा सामना केला आणि 121 धावा साकारल्या. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 408 चेंडूत 285 धावांची भागीदारी झाली. या दोघांव्यतिरिक्त एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज या सामन्यात अर्धशतक करू शकला नाही.

भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज पुन्हा एकदा महत्वाची भूमिका पार पाडताना दिसला. सिराजने 28.3 षटकात 108 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजा याने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेविड वॉर्नर याने 43, मार्नस लाबुशेन याने 26, तर ऍलेक्स केरी याने 48 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त संघातील एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही.

(Australia have piled up 469 runs in the first innings of the WTC 2023 final.)
बातमी अपडेट होत आहे…

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या- 
रोहितच्या ‘या’ निर्णयावर संतापले रवी शास्त्री; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘बरोबर बोललात गुरुजी’
पाँटिंगने ‘या’ दिग्गजासोबत केली विक्रमवीर हेडची तुलना, म्हणाला, ‘तो सुरुवातीलाच गोलंदाजाला दबावात…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---