जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी (11 जून) ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर झालेला हा सामना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 209 धावांच्या अंतराने जिंकला. ऑस्ट्रेलियन संघात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क खेळत असल्यामुळे त्याची पत्नी एलिसा हिली देखील मैदानात उपस्थिती होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात एलिसा हिली आणि मिचेल स्टार्क या जोडीचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. दोघांनी मिळून एकूण 11 आयसीसी ट्रॉफी आपल्या संघाला जिंकवून दिल्या आहेत.
डब्ल्यूटीसी 2021-23 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाने आपल्या प्रदर्शनाच्या जोराव अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. अगदी पहिल्या दिवसापासून आघाडीवर असणारा ऑस्ट्रेलियन संघ शेवटपर्यंत आपले वर्चस्व कायम ठेवून होता. इएसपीएन क्रिकइंफोच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी आतापर्यंत एकूण 22 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यापैकी एकूण 11 ट्रॉफी जिंकताना एलिसा हिली आणि मिचेल स्टार ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होते.
मिचेल स्टार्क आणि एलिसा हिली संघात असताना ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या आयसीसी ट्रॉफी
2010 टी-20 विश्वचषक (महिला)
2012 टी-20 विश्वचषक (महिला)
2013 वनडे विश्वचषक (महिला)
2014 टी-20 विश्वचषक (महिला)
2015 वनडे विश्वचषक (पुरुष)
2018 टी-20 विश्वचषक (महिला)
2020 टी-20 विश्वचषक (महिला)
2021 टी-20 विश्वचषक (पुरुष)
2022 वनडे विश्वचषक (महिला)
2023 टी-20 विश्वचषक (महिला)
2023 डब्ल्यूटीसी (पुरुष)
त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन महिला संघाने 2022 राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले होते. एलिसा हिली यावेळीही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत होती. दरम्यान, डब्ल्यूटील 2021-23च्या अंतिम सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने 469 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 296 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने आपली आघाडी 443 धावांपर्यंत नेली आणि भारताला विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले.
शेवटच्या डावात विजयाच्या हेतून मैदानात उतरलेला भारतीय संघ कसाबसी 234 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि 209 धावांनी पराभव स्वीकारला. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीचा उपविजेता बनला. मागच्या वेळी अंतिम सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून, तर यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया पहिला असा संघ बनला आहे, ज्यांनी आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकल्या आहेत. (Australia have won 11 ICC trophies with Alyssa Healy and Mitchell Starc playing)
महत्वाच्या बातम्या –
बाबरला पछाडत ‘हा’ युवा ठरला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ, महिला विभागात ‘ही’ ठरली सर्वोत्तम
गंभीरचा अप्रत्यक्षपणे धोनीवर निशाणा! म्हणाला, ‘संघात काही खेळाडूंनाच हिरो ठरवलं गेलं…’