पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियाने केलेल्या पाकिस्तान दौऱ्यात अप्रतिम कामगिरी करत तीन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली होती. त्यांनी तब्बल ११ वर्षानंतर आशिया खंडामध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. श्रीलंका दौऱ्यातही पहिला कसोटी सामना १० विकेट्सने जिंकला दौऱ्याला चांगली सुरूवात केली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचे आता पाकिस्तान, श्रीलंकेनंतर भारतावर लक्ष असणार आहे. यासाठी त्यांनी व्यूहरचना तयार केली आहे.
पाकिस्तानमध्ये चेंडू खेळपट्टीवर टर्न घेत होता अशा स्थितीतही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी उत्तम रनरेटने धावा काढल्या आहेत. श्रीलंकेच्या गॉल स्टेडियमची खेळपट्टी ही ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यतची सर्वात कठीण खेळपट्टी ठरली आहे. येथे ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी १८ विकेट्स घेत सामन्यात आपले वर्चस्व ठेवले होते. भारताविरुद्धही ऑस्ट्रेलिया संघाला अशा खेळपट्ट्या मिळाल्या तर ते अशीच खेळी करणार असल्याने ऑस्ट्रेलिया संघाचे सहाय्यक प्रशिक्षक डॅनियन विट्टोरी (Daniel Vettori) याने स्पष्ट केले आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी खेळपट्टी असते. मात्र ऑस्ट्रेलिया संघाला पाकिस्तानसारखी खेळपट्टी मोहालीमध्ये मिळू शकते. श्रीलंकेसारखी फिरकीपटूंना पुरक अशी खेळपट्टी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी करण्याची आशा आहे.
विट्टोरी म्हणाला, “ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पाहिली असता खेळाडू रिव्हर्स स्वीपने अधिक धावा केल्या आहेत. मात्र भारतामध्ये ही बाब अशक्य दिसत आहे. कारण ज्या खेळाडूंनी रिव्हर्स स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला त्यांना अधिक धावा मिळाल्या नाहीत. अशावेळी त्या खेळाडूने मिळेल त्या संधीत धावा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
“ऍलेक्स कॅरीने सर्वाधिक रिव्हर्स स्वीप शॉट मारला आहे. या शॉटमध्ये त्याने अधिक धावाही काढल्या आहेत. माझ्यामते, त्याने १२च्या जवळपास हे शॉट्स खेळले आहेत,” असेही विट्टोरी पुढे म्हणाला आहे.
ऑस्ट्रेलियाला २००४नंतर भारतामध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाने भारतात आतापर्यंत १४ कसोटी मालिका खेळल्या आहेत. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्याची परतफेड म्हणून ऑस्ट्रेलिया भारताच्या या दौऱ्यात वरचढ ठरण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया भारतात फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अर्थातच ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या स्पर्धेतील मालिका असणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना जून २०२३मध्ये खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संघ निवडच चुकली; भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटरचे ‘या’ खेळाडूला वगळण्यावरून प्रश्नचिन्ह
पंत-जडेजाच्या शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडने ७ विकेट्सने जिंकली पाचवी कसोटी; मालिकाही बरोबरीत
कोहलीनंतर आता अँडरसनबद्दल बोलताना सेहवागची घसरली जीभ, म्हणाला ‘आता तो म्हातारा झालाय’