ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाॅन्टिंगनं (Ricky Ponting) इंग्लंडच्या पांढऱ्या चेंडू क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्याबाबतच्या अटी फेटाळून लावल्या आहेत. मॅथ्यू मोट यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नाही. तत्पूर्वी रिकी पॉन्टिंगनं म्हटलं आहे की, सध्या तो ज्या परिस्थितीत आहे, ते पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नोकरी त्याच्यासाठी नाही. मॉट गेल्यानंतर इंग्लंडच्या प्रशिक्षकपदासाठी अनेक माजी दिग्गजांची नावे पुढे आली. पण बहुतांश माजी क्रिकेटपटू या शर्यतीपासून दूर झाले.
आयसीसी पुनरावलोकनाच्या भागात रिकी पाॅन्टिंगनं इंग्लंडचा प्रशिक्षक बनण्यासाठीची ईच्छा मागे घेतली आहे. अलीकडेच दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झाला असला तरी, त्याच्याकडे अजून खूप काम बाकी आहे, असेही तो म्हणाला. इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याचा विचार करणार का, असे पॉन्टिंगला विचारले असता पॉन्टिंग म्हणाला, “नाही, मी असे करण्याचा विचार कधीच करणार नाही.”
पाॅन्टिंग म्हणाला की, “मी हे जाहीरपणे सांगत आहे की सध्या माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय नोकऱ्या इतक्या महत्त्वाच्या नाहीत, कारण आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांना खूप वेळ लागतो. इतर आंतरराष्ट्रीय संघांना प्रशिक्षण देणं ही एक गोष्ट आहे. परंतु, ऑस्ट्रेलिया सोडून इंग्लंडचा प्रशिक्षक बनणं ही कदाचित वेगळी गोष्ट आहे. सध्या माझ्याकडे खूप काम आहे, ऑस्ट्रेलियात काही व्हाईट-बॉल स्पर्धा येत आहेत, जिथे मी जाईन आणि कॉमेंट्री करेन.”
रिकी पाॅन्टिंगच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 168 कसोटी, 375 एकदिवसीय आणि 17 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 168 कसोटी सामन्यात त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 13,378 धावा केल्या आहेत. तर 375 एकदिवसीय सामन्यात त्यानं 13,704 धावा केल्या. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 17 सामन्यांमध्ये 401 धावा आहेत त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 98 आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाॅन्टिंगच्या नावावर 71 शतक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? या दिवशी येणार कोर्टाचा निर्णय
“तोही माझ्या मुलासारखाच आहे” पाकिस्तानच्या अर्शदच्या आईनं निरज चोप्राला दिला खास संदेश
सिल्वर मेडल मिळवणाऱ्या नीरज चोप्राला मोदींचा काॅल, दुखापतीबद्दल काय म्हणाले?