पर्थ। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या चार सामन्यांच्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील मेलबर्न आणि सिडनी या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीतील 13 जणांचा संघच कायम केला आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघात मिशेल स्टार्क, पिटर सिडल, उपकर्णधार जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स हे वेगवान गोलंदाज आणि नॅथन लायन हा एकमेव फिरकी गोलंदाज असेल.
तसेच फलंदाजीच्या फळीत ऍरॉन फिंच, मार्कस हॅरिस, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, पिटर हँड्सकॉम्ब यांचा समावेश आहे. त्याचबरोबर टीम पेन नेतृत्वाबरोबरच यष्टीरक्षणाची जबाबदारीही पार पाडेल. याबरोबरच ऑस्ट्रेलिया संघात मार्श बंधूंनाही कायम करण्यात आले आहे.
तसेच अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीसाठी 14 जणांच्या संघात समावेश असलेला ख्रिस ट्रेमेनला पर्थ कसोटीआधी मुक्त करण्यात आले होते. त्याला पुढील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी संघात घेण्यात आलेले नाही.
या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. तर ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे आणि चौथ्या सामना सिडनी येथे 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
असा आहे मेलबर्न आणि सिडनी कसोटीसाठी 13 जणांचा ऑस्ट्रेलिया संघ-
ऍरॉन फिंच, मार्क्यूस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, टीम पेन(कर्णधार, यष्टीरक्षक) पॅट कमिंन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड(उपकर्णधार), नॅथन लायन, मिशेल मार्श(उपकर्णधार), पिटर सिडल.
महत्त्वाच्या बातम्या:
–किंग कोहलीच्या बाबतीत झाला कोणालाही नको असलेला योगोयोग
–कोहली-पेन वाद हा खिलाडूवृत्तीला धरूनच – जोश हेजलवूड
–तब्बल ३५ वर्षांनंतर टीम इंडियावर आली अशी वेळ
–केएल राहुलला भारतात लवकर परतण्यासाठी चाहत्याने सुचवले हे विमान