रविवारी (दि. 24 सप्टेंबर) इंदोरच्या होळकर स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघातील नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवत भारत मालिका जिंकण्याचा, तर ऑस्ट्रेलिया पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात काही बदल झाले आहेत. संघाचे नेतृत्व पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या जागी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) करणार आहे. स्पेन्सर जॉन्सन हा या सामन्यातून पदार्पण करत आहे. तसेच, जोश हेझलवूड आणि ऍलेक्स कॅरे यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच, भारतीय संघातही महत्त्वाचा बदल आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाहेर पडला असून त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याला सामील करण्यात आले आहे.
पहिला सामना भारताच्या नावे
उभय संघातील पहिला सामना मोहालीत पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात सर्व विकेट्स गमावत 276 धावा केल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने 48.4 षटकात 5 विकेट्स राखून पार केले. या विजयासोबत भारताने मालिकेतही 1-0ने आघाडी घेतली होती. अशात आता हा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दुसऱ्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा
https://twitter.com/BCCI/status/1705849593114816719
ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्यूशेन, जोश इंग्लिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सीन ऍबॉट, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन (Australia opt to bowl against india 2nd odi)
महत्त्वाच्या बातम्या-
ना दुखापत, ना कसला त्रास, तरीही बुमराह दुसऱ्या वनडेतून बाहेर; BCCIने सांगितलं मोठं कारण
‘The Wall’ द्रविडच्या कुटुंबातून आनंदाची बातमी! लेक समितची ‘या’ संघात निवड, लगेच वाचा






