---Advertisement---

IND vs AUS 2nd T20i । नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात, संघात ‘हे’ दोन बदल

On: रविवार, नोव्हेंबर 26, 2023 6:39 PM
Matthew Wade
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना तिरुवनंतपूरम याठिकाणी आयोजित केला गेला आहे. रविवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी हा सामना सुरू झाला असून नाणेफेक ऑस्ट्रेलिया संघाने जिंकली. नाणेफेकीचा कौल आपल्या पारड्यात पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियन संघात दोन महत्वाचे बदल पाहायाला मिळत आहेत. ऍडम झॅम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले आहे. दुसरीकडे जेसन बेहरनडॉर्फ आणि आरोन हार्डी यांना विश्रांती दिली गेली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत –
यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया – स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक आणि कर्णधार), शॉन ऍबॉट, नॅथन एलिस, ऍडम झाम्पा, तन्वीर संघा.
(Australia opt to Bowl in the 2nd T20I against India.)

महत्वाच्या बातम्या – 
IPL 2024 Retention: मुंबई इंडियन्सचे रिटेन खेळाडू जाहीर, मोठ्या नावांना दिला नारळ, वाचा यादी 
IPL 2024 मध्ये दिसणार गंभीरची KKR! ही आहे रिटेन खेळाडूंची यादी, शार्दुल रिलीज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---