• About Us
मंगळवार, मे 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

मालिका विजयासाठी कांगारू सज्ज! अशी आहे ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

Mahesh Waghmare by Mahesh Waghmare
डिसेंबर 25, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
australia-adelaid-test-win

Photo Courtesy: Twitter/ICC


जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध कसोटी मालिका म्हणून ओळखली जाणारी ऍशेस मालिका (Ashes 2021-2022) सध्या सुरू आहे. ऑस्ट्रेलिया यावर्षी या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून, त्यांनी यजमानांना साजेशी कामगिरी केली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात यजमानांनी मोठे विजय मिळवले. मालिकेतील तिसरा सामना रविवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) सुरू होईल. या बॉक्सिंग डे कसोटीसाठी (Boxing Day Test) यजमान ऑस्ट्रेलियाने एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. (Australia XI For Boxing Day Test)

ऑस्ट्रेलिया संघात एक बदल
ब्रिस्बेन आणि ऍडिलेड कसोटी जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी महत्त्वाची आघाडी घेतली आहे. बॉक्सिंग डे कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे, इंग्लंड संघ पहिल्या दोन पराभवातून धडा घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी आपल्या संघात तब्बल चार बदल केले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने दोन मात्र निर्णायक एक बदल केले. दुसऱ्या सामन्याला मुकलेला नियमित कर्णधार पॅट कमिन्स या सामन्यातून पुनरागमन करेल. त्यामुळे, दुसऱ्या कसोटीत शानदार कामगिरी करूनही झाय रिचर्डसन त्याला संघाबाहेर बसावे लागणार आहे. तसेच, मायकल नेसर याच्या जागी वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड (Scott Boland Test Debute) याला पदार्पणाची संधी देण्यात येईल.

ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी
ब्रिस्बेन येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर, ऍडिलेड येथील दुसऱ्या दिवस-रात्र कसोटीत त्यांनी तब्बल २७५ धावांनी विजय साकार केलेला. ऑस्ट्रेलियाचे सर्व फलंदाज व गोलंदाजी यांनी या दोन्ही विजयात समान योगदान दिले आहे.

मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ-
डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरीस, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), ट्रेविस हेड, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड व नॅथन लायन.

महत्त्वाच्या बातम्या-

दीपक चाहरचा स्विंग पाहून चाहते चकित; म्हणाले, ‘हे फक्त आशिया खंडाच्या बाहेरच होऊ शकते’ (mahasports.in)

रहाणे, अय्यर की विहारी? कोण खेळणार पाचव्या क्रमांकावर? उपकर्णधार राहूलने केला खुलासा (mahasports.in)

पाकिस्तानशी दोन हात करण्यास ‘यंग इंडिया’ सज्ज! विश्वचषकातील पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी (mahasports.in)

 


Previous Post

राजकारणाच्या पिचवर उतरणार का हरभजन? स्वतः दिले उत्तर; म्हणाला…

Next Post

Video: सामना जिंकण्यासाठी फलंदाजाने केली चीटिंग, पंचांना लक्षात येताच संपूर्ण संघाला ठोठावला दंड

Next Post
Batmans-Doing-Cheating

Video: सामना जिंकण्यासाठी फलंदाजाने केली चीटिंग, पंचांना लक्षात येताच संपूर्ण संघाला ठोठावला दंड

टाॅप बातम्या

  • नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर
  • अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर
  • ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
  • सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
  • IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
  • आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
  • IPL ब्रेकिंग! अहमदाबादेत पुन्हा धो-धो, अंतिम सामना थांबवला, पाऊस न थांबल्यास काय होणार?
  • फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
  • डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन
  • ‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
  • ‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
  • वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
  • हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
  • जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
  • फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
  • IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  • विराटबाबत बोलताना इरफानचा गंभीरवर निशाणा, अष्टपैलूचे वक्तव्य बनले चर्चेचा विषय
  • भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
  • ‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video
  • WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In