---Advertisement---

ग्रीन-डेव्हिडच्या फटकेबाजीने ऑस्ट्रेलिया फ्रंटफुटवर! टीम इंडियासमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान; अक्षर पुन्हा चमकला

On: रविवार, सप्टेंबर 25, 2022 8:47 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर सुरू झाला. मालिकेतील या निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने राहिला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या ऑस्ट्रेलियाला कर्णधार ऍरॉन फिंच व युवा कॅमेरून ग्रीन यांनी वादळी सुरुवात दिली. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला काहीसे रोखले. मात्र, टीम डेव्हिडने अर्धशतक केल्याने ऑस्ट्रेलियाने 186 धावांपर्यंत मजल मारली.

 

मोहली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात वेगवान खेळी करणाऱ्या कॅमेरुन ग्रीनने या सामन्यातही पहिल्या षटकापासून फटकेबाजीला सुरुवात केली. फिंच व ग्रीन यांनी पहिल्या गड्यासाठी 3.3 षटकात 44 धावा केल्या. फिंच बाद झाल्यानंतरही ग्रीनने आपले आक्रमण सुरू ठेवले. त्याने अवघ्या 19  चेंडूंमध्ये 7 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक साजरे केले. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावली. स्टीव स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात बाद झाल्यानंतर टीम डेव्हिड व जोस इंग्लिश यांनी डावाची जबाबदारी खांद्यावर घेतली.

इंग्लिशने आश्वासक 24 धावा बनविल्या. मात्र, त्यानंतर 14 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अक्षर पटेल यांनी इंग्लिश व मागील सामन्यात वेगवान फलंदाजी करणाऱ्या मॅथ्यू वेड यांना बाद करत सामन्याला आणखी भारताच्या दिशेने आणले. मात्र, त्यानंतर डॅनियल सॅम्स आणि टीम डेव्हिडने आक्रमणाची दुसरी फेरी सांभाळली. दोघांनी भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांच्या षटकांमध्ये अनुक्रमे 21 व‌ 18 धावा वसूल केल्या. डेव्हिडने अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत डेव्हिडने आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तो बाद झाल्यानंतर उर्वरित तीन चेंडूंमध्ये केवळ एक धाव आल्याने ऑस्ट्रेलिया 186 पर्यंत पोहोचू शकली. भारतासाठी अक्षर पटेलने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

निर्णायक सामन्यात नाणेफेक भारताच्या बाजूने! प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भुवनेश्वरचे पुनरागमन

देशांतर्गत क्रिकेटबद्दल ‘चॅम्पियन’ कर्णधार रहाणेचे लक्षवेधी विधान; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---