भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चेन्नई येथे वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका आपल्या नावे करण्यासाठी दोन्ही संघांनी या सामन्यात प्रयत्नांची पराकाष्टा केली. ऑस्ट्रेलियन संघाच्या सलामीवीरांनी दिलेल्या चांगल्या सलामीनंतर इतर फलंदाज अपयशी ठरल्याने ऑस्ट्रेलिया संघाला अपेक्षित धावसंख्या करता आली नाही. हार्दिक पंड्या व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचा डाव 269 धावांवर रोखला.
3RD ODI. WICKET! 48.6: Mitchell Starc 10(11) ct Ravindra Jadeja b Mohammed Siraj, Australia 269 all out https://t.co/Be8688CLXC #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) March 22, 2023
विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या दोन्ही संघातील नाणेफेक ऑस्ट्रेलियान कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने जिंकली. संधी मिळाल्यानंतर भारतीय संघाला पहिले यश मिळण्यासाठी मोठी वाट पाहावी लागली. हेड व मार्श जोडीने या सामन्यात देखील 68 धावा जोडल्या. मात्र, हार्दिक पंड्या याने गोलंदाजीला येत पहिल्यांदा हेड व त्याच्या पुढील षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ याला शून्यावर तंबूत पाठवले. या दोन धक्क्यातून ऑस्ट्रेलियन संघ सावरत असताना त्याने पुढील षटकात जम बसलेल्या मार्शला देखील बाद केले. 40 धावांची भागीदारी केलेल्या वॉर्नर व लॅब्युशेन यांना कुलदीपने तंबूचा रस्ता दाखवला.
संकटात सापडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला केरी व स्टॉयनिस यांनी बाहेर काढत 200 जवळ नेले. मात्र, ते दोघे देखील अवघ्या काही चेंडूंच्या अंतराने बाद झाले. तळाच्या फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिल्याने ऑस्ट्रेलिया संघ 269 पर्यंत पोहोचू शकला. भारतासाठी हार्दिक व कुलदीप यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले.
(Australia Post 269 Against India In Chennai ODI Hardik Pandya Kuldeep Yadav Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठ महिने आधीच कोच द्रविड यांनी उघड केला टीम इंडियाचा ‘वर्ल्डकप प्लॅन’! म्हणाले, “17-18 खेळाडू…”
तब्बल 6 वर्षांनंतर वनडेत स्मिथच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, पंड्याने उचलला सिंहाचा वाटा