ऍशेस 2023च्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला चांगली सुरुवात मिळाली. ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर बुधवारी (28 जून) हा सामना सुरू झाला. पहिल्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाने 5 बाद 339 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या तिघा फलंदाजांनी अर्धशतक केले.
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक गमावली आणि त्यांना प्रथम फलंदाजीसाठी यावे लागले. सलामीवीर डेविड वॉर्नर पहिल्या कसोटीत अपयशी ठरला होता. पण यावेळी त्याने संघाला चांगली सुरुवात देत वैयक्तिक अर्धशतक केले. वॉर्नरने 88 चेंडूत 66 धावा केल्या. मध्यल्या फळीतील स्टीव स्मिथ आणि यष्टीरक्षक फलंदाज ट्रेविस हेड () यांनीही वैयक्तिक अर्धशतके केली. हेडने 73 चेंडूत 77 धावा करून विकेट गमावली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्मिथ 149 चेंडूत 85*, तर यष्टीरक्षक ऍलेक्स केरी 34 चेंडूत 11* धावांसह खेळपट्टीवर कायम होते.
दुसरीकडे इंग्लंड संघाचे प्रदर्शन पाहिले, तर जो रुट आणि जोश टंग यांना पहिल्या दिवशी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याने एक विकेट घेतली. सलामीवीर उस्मान ख्वाजा (17) आणि डेविड वॉर्नर (66) यांच्या विकेट्स जोश टंगला मिळाल्या, जो या मालिकेतील पहिलाच सामना खेळत आहे. मोईन अलीला दुखापत झाल्यामुळे टंगाल प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले आहे. खेलपट्वीर सेट झालेल्या ट्रेविस हेड (77) आणि कॅमरून ग्रीन यांच्या विकेटचे श्रेय रुटच्या फिरकीला मिळाले. तर ओली रॉबिन्सनच्या भेदक गोलंदाजीमुळे मार्नल लॅबुशेनचे शतक थोडक्यात हुकले. लॅबुशेनने 47 धावांवर विकेट गमावली. (Australia scored 339 for 5 on the first day of the Lord’s Test)
बातमी अपडेट होत आहे….
महत्वाच्या बातम्या
पुणेरी बाप्पा Qualifier 2 मधून आऊट, कोल्हापूर टस्कर्सला मिळालं फायनलचं तिकीट
बुमराह कधी करणार पुरनागमन? विश्वचषकाचे वेळापत्रक येताच समोर आली मोठी अपडेट