आगामी काळात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी आता सर्व क्रिकेट संघानी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. टी20 क्रिकेटचा सराव होण्यासाठी सर्व संघ जास्तीत जास्त टी20 सामने खेळत आहेत. अशातच बातमी समोर येत आहे की ऑस्ट्रेलियन संघ आगामी काळात बांगलादेशलाचा दौरा करणार असून तिथे ते 3 सामन्यांऐवजी 5 टी -20 सामने खेळणार आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याबाबत नुकतीच सविस्तर माहिती दिलेली आहे.
भारतातील आघाडीचे क्रिकेट संकेत स्थळ असलेल्या क्रिकबझ यांच्या माहितीनुसार, मूळ वेळापत्रकानुसार सुरुवातीला न्यूझीलंड संघ 3 टी20 सामन्यांसाठी बांगलादेशचा दौरा करणार होते आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ दौरा करणार होता. मात्र आता स्पष्ट करण्यात आले आहे की, ऑस्ट्रेलियन संघ ऑगस्टच्या सुरूवातीस वेस्ट इंडिजचा दौरा केल्यानंतर थेट बांगलादेशचा दौरा करेल. व यानंतर न्यूझीलंडचा संघ बांगलादेशचा दौरा करेल.
बांगलादेश क्रिकेट संचलनाचे अध्यक्ष अक्रम खान यांनी पत्रकारांना सांगितले की, “हे आता स्पष्ट आहे की ऑस्ट्रेलियन संघाने 3 ऐवजी 5 टी20 सामने खेळण्यास सहमती दर्शविली आहे. हे सामने 8 ते 9 दिवस चालतील. आगामी टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने आमची चांगली तयारी सुरू आहे.”
मागील काही काळापासून बांगलादेश क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केलेली आहे. व त्यामुळे हे स्पष्टच आहे की संपूर्ण मालिका उत्साहवर्धक होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट साठी बांगलादेशसारख्या संघांचे अधिक मजबूत होणे हे अतिशय उत्तम लक्षण मानले जात आहे. बांगलादेशचे प्रमुख खेळाडू शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम व तमिम इक्बाल हे सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की ऑस्ट्रेलिया सारख्या जागतिक आघाडीच्या संघाविरुद्ध बांगलादेश आपली गुणवत्ता दाखवण्यात यशस्वी ठरतो अथवा नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक २०२३ मध्ये कोण असेल भारतीय संघाचा फिनिशर? या खेळाडूंचा आहे पर्याय
इंग्लंड दौऱ्यावर यशस्वी होण्यासाठी विश्वविजेत्या कर्णधाराने रिषभ पंतला दिला हा कानमंत्र
टी२० वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूची निवृत्ती, केल्या आहेत बारा हजारपेक्षा जास्त धावा