---Advertisement---

पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलिया संघ!

---Advertisement---

पाकिस्तान विरूद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 14 ऑस्ट्रेलियन खेळाडूची घोषणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या कसोटी संघात अ‍ॅशेस मालिकेतील खराब कामगिरीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघ व्यवस्थापनाने पाठिंबा देत संघात कायम केले आहे. तसेच कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टलाही संघात स्थान मिळाले आहे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघात स्टिव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड असे फलंदाज आहेत. तर गोलंदाजामध्ये मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, नॅथन लायन हे अनुभवी गोलंदाज आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचाही भाग असणार आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ब्रिस्बेनमध्ये खेळला जाईल. त्याचबरोबर दुसरा सामना ऍडलेडमध्ये 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत खेळला जाईल.

महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानचा संघ आपला नवीन कर्णधार अझर अलीच्या नेतृत्वात पहिली कसोटी मालिका खेळेल. तसेच पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणून मिसबाह उल हक यांची ही पहिलीच कसोटी मालिका असेल.

असा आहे ऑस्ट्रेलियन संघ –

टिम पेन (कर्णधार /यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, मार्नस लॅबुशाने, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जेम्स पॅटिनसन, नॅथन लायन, जोश हेजलवुड आणि मायकेल नासिर.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---