पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) फायनल सामना होणार आहे. हा जेतेपदाचा सामना (11 जून) पासून खेळला जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट क्रिडा स्पर्धेच्या फायनल सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आक्रमक सलामीवीर सॅम कॉन्स्टास आणि तंदुरुस्त परतलेला अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मिचेल मार्शला संघात स्थान मिळालेले नाही.
ऑस्ट्रेलियन निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी ‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’ ला सांगितले की, “श्रीलंकेला मालिकेत हरवून संघाने WTC सायकलचा शानदार शेवट केला. यापूर्वी, भारताला एका दशकात पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. गेल्या 2 वर्षांत संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि आता आपल्याकडे जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेतेपद राखण्याची संधी आहे.”
WTC फायनल (11 ते 15 जून) दरम्यान लॉर्ड्स येथे खेळला जाईल. यादरम्यान WTC फायनलसाठी जाहीर केलेला ऑस्ट्रेलियन संघ (25 जून)पासून वेस्ट इंडिजमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
WTC फायनल आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ- पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुनहेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.






