आपल्या देशासाठी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आपल्या संघासाठी दीर्घकाळ महत्त्वाच्या ठिकाणी योगदान देण्याचे स्वप्न असते. प्रत्येक खेळाडूला देशासाठी खेळून आपली कारकीर्द अविस्मरणीय करायची असते. मात्र, अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू विल पुकोव्स्कीनं (Will Pucovski) वयाच्या केवळ 26व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. अचानक निवृत्ती घेण्याचे कारणही तसेच धक्कादायक आहे.
स्वत:च्या देशासाठी केवळ 1 सामना खेळलेला पुकोव्स्की भविष्यातील मोठा खेळाडू मानला जात होता. पदार्पणाच्या सामन्यातच त्यानं शानदार अर्धशतक झळकावून आपली झलक सर्वांनाच दाखवली होती. मात्र, इतकी प्रतिभा असूनही एवढ्या वयात त्याला क्रिकेटला अलविदा करावे लागले. या बातमीद्वारे आपण त्याच्या अचानक निवृत्ती घेण्यामागचे कारण काय आहे? हे जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू विल पुकोव्स्कीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. विलला त्याच्या छोट्या कारकिर्दीत अनेकदा दुखापत झाली आहे. विशेषत: त्याच्या डोक्याला अनेकवेळा बॉल लागल्याने त्याला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीमुळे वैद्यकीय पथकाने त्याला कोणताही धोका न घेण्याचा सल्ला दिला. विल पुकोव्स्कीबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, चेंडू वारंवार डोक्यावर लागल्यामुळे तो खूप तणावाखाली होता आणि मानसिक आघात झाला होता. दुखापतीनंतर तो सतत अडचणीत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
काश्मीरमध्ये तब्बल 38 वर्षांनंतर क्रिकेट परतणार! धवन-कार्तिकसारखे दिग्गज दिसतील ॲक्शनमध्ये
Champion’s Trophy 2025: जय शाह ICC अध्यक्ष बनले, तरीही भारत पाकिस्तानात जाणार?
रोहित शर्मा सोडणार मुंबईची साथ? आयपीएल 2025 पूर्वी चर्चांना उधाण