---Advertisement---

फिट असूनही दुसऱ्या वनडे सामन्यातून स्टीव्ह स्मिथला वगळले; बोर्डाने सांगितले ‘हे’ कारण

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 11:27 AM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या डोक्याला झालेल्या दुखापतीचा वैद्यकीय अहवाल चांगला आला आहे. परंतु तरीही इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यातील अंतिम ११ जणांच्या संघात त्याला स्थान देण्यात आले नव्हते. खबरदारीचा उपाय म्हणून त्याचा समावेश करण्यात आला नव्हता.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळावर बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “स्टीव्ह स्मिथ दोन्ही तपासणीत तंदुरुस्त असल्याचे आढळले आहे, परंतु खेळाडूची अधिक काळजी घेण्यासाठी आम्ही त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.”

तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी स्मिथला सरावादरम्यान डोक्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो पहिला वनडे सामना खेळला नाही.  पण तरीही हा सामना ऑस्ट्रेलियाने 19 धावांनी जिंकला.

मागील वर्षी इंग्लंड दौर्‍यावरही स्मिथला अ‍ॅशेस मालिकेदरम्यान कन्कशन टेस्ट कराव्या लागल्या होत्या. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू डोक्यावर लागला होता.

शनिवारी दुसऱ्या वनडे सामन्याआधी ऑस्ट्रेलियाने म्हटले होते की, ‘जगातील प्रथम क्रमांकाचा कसोटी फलंदाज स्मिथने शुक्रवारी व शनिवारी घेतल्या गेलेल्या दोन्ही कन्कशन टेस्ट पास केल्या आहेत. खबरदारी म्हणूनही त्याला पहिल्या सामन्यातून वगळण्यात आले होते.’

आता तिसरा वनडे सामना १६ सप्टेंबरला होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---