कॅनबेरा। बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका संपली. ही मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात टी२० मालिका होणार आहे. या टी२० मालिकेत ३ सामने होणार आहेत. हे सामने ६ ते ८ डिसेंबरदरम्यान होतील.
वॉर्नर, कमिन्स शिवाय टी२० मालिकेसाठी उतरणार ऑस्ट्रेलिया संघ –
आगामी टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे अनुभवी क्रिकेटपटू डेविड वॉर्नर आणि पॅट कमिन्स यांचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश नाही. वॉर्नरला भारताविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळताना मांडीची दुखापत झाली होती. त्यामुळे तो तिसऱ्या वनडेतही खेळला नाही आणि आता तो टी२० मालिकेलाही मुकणार आहे. त्याच्याऐवजी डॉर्सी शॉर्टचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश केला आहे.
तसेच १७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या दृष्टीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सला टी२० मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. त्यामुळे तो टी२० मालिकेत खेळणार नाही.
अशी आहे फलंदाजांची फळी –
वॉर्नर जरी ऑस्ट्रेलियन संघात नसला तरी कर्णधार ऍरॉन फिंच, मॅथ्यू वेड, ऍलेक्स कॅरे, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशाने, डॉर्सी शॉर्ट हे फलंदाज ऑस्ट्रेलियन संघात आहेत. त्यांच्यातील कॅरे आणि वेड हे यष्टीरक्षणासाठी पर्याय असतील.
गोलंदाजांची फळी –
ऑस्ट्रेलिया संघात गोलंदाजांच्या फळीत अनुभवी मिशेल स्टार्क, अँड्र्यू टाय, ऍडम झम्पा, सीन ऍबॉट आणि जोश हेझलवूड हे प्रमुख गोलंदाज आहेत.
अष्टपैलू खेळाडू –
ऑस्ट्रेलियन संघात अष्टपैलू खेळाडूंची फळी मजबूत आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, ऍश्टन एगार, कॅमेरॉन ग्रीन, मोझेस हेन्रीक्स आणि डॅनिएल सॅम्स यांचा समावेश आहे. त्यांच्यातील मॅक्सवेल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर एगार आणि ग्रीननेही शेवटच्या वनडेत चांगली कामगिरी केली आहे.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ –
ऍरॉन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन एगार, ऍलेक्स कॅरे, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवुड, मोसेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशाने, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, डॉर्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, अँड्र्यू टाय, ऍडम झम्पा.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! आयपीएल २०२१ मध्ये एक नाही, तर दोन नवीन संघ खेळणार; ‘या’ शहराचे नाव निश्चित
आयएसएल २०२०: ओडिशाविरुद्ध धडाकेबाज विजयाचा एटीके मोहन बागानचा निर्धार
ट्रेंडिंग लेख –
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव