भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा तिसरा कसोटी सामना इंदोर येथे सुरू झाला. बुधवारी (1 मार्च) सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघावर वर्चस्व गाजवत आघाडी घेतली. भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात केवळ 109 धावा करता आल्या. त्यानंतर उस्मान ख्वाजा याच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 बाद 156 अशी मजल मारत 47 धावांची आघाडी घेतली आहे.
Australia take a valuable lead on day one of the Indore Test 🏏#WTC23 | #INDvAUS | 📝: https://t.co/MFbjU9frC0 pic.twitter.com/qiDTWQMnHD
— ICC (@ICC) March 1, 2023
मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर हा सामना जिंकण्याचे इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्याच षटकात रोहितला दोन जीवदान मिळाली. परंतु, तो याचा फायदा घेऊ शकला नाही. सहाव्या षटकात तो बाद झाला. त्यानंतर भारताचे फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतू लागले. भारताने 45 धावांवर आपले पाच फलंदाज गमावले होते. त्यानंतर विराट कोहली व केएस भरत यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते देखील पहिल्या सत्रातच बाद होऊन परतले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारताचे उर्वरित तीन फलंदाज बाद करत ऑस्ट्रेलियाने यजमान संघाचा डाव 109 धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियासाठी कुन्हेमनने पाच फलंदाज बाद केले. तर, लायनने तिघांना तंबूचा रस्ता दाखवला.
त्यानंतर ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात ही खराब झाली. ट्रेविस हेड धावफलकावर 12 धावा असताना बाद झाला. शून्य धावेवर मिळालेल्या जीवनाचा फायदा घेत लॅब्युशेनने उस्मान ख्वाजासह 96 धावांची भागीदारी केली. लॅब्युशेन 31 धावा करत तंबूत परतला. ख्वाजाने बाद होण्यापूर्वी शानदार 60 धावांची खेळी केली. कर्णधार स्मिथने 27 धावांचे योगदान दिले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 4 बाद 156 अशी मजल मारत 47 धावांची आघाडी घेतली होती. भारताकडून चारही बळी रवींद्र जडेजा याने टिपले.
(Australia Take 47 Runs Lead On Indore Test Day 1 Spinners And Khwaja Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेम्स अँडरसनची बादशाहत अश्विनकडून उद्ध्वस्त! बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज
भारतात येऊन भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा मॅथ्यू दुसराच ऑस्ट्रेलियन, 2004मध्ये घडलेला विक्रम