संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष सध्या आगामी टी20 विश्वचषक 2022 वर लागून आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात ही आयसीसी स्पर्धा खेळली जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी ही मालिका अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. 20 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ भारतासाठी रवाना झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याने आपण भारतासाठी उड्डाण भरली (Australia Team Departs For India) असल्याची माहिती दिली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर विमानातील आपला फोटो शेअर केला आहे, ज्यावर त्याने विमान आणि भारताच्या तिरंग्याचे इमोजी पोस्ट केले आहे. हे इमोजी दर्शवतात की, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे 3 खेळाडू दुखापतीमुळे मालिकेबाहेर
दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचे 3 प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेतून बाहेर झाले आहेत. मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क आणि मिशेल मार्श हे दुखापतीमुळे भारताविरुद्ध खेळू शकणार नाहीत. ऑस्ट्रेलिया संघाने त्यांच्या पर्यायी खेळाडूंचीही घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैली स्टॉयनिस स्नायूंच्या ताणामुळे या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू मिशेल मार्श हेदेखील दुखापतग्रस्त आहेत. स्टार्कला गुडघ्याची दुखापत झाली आहे. तर मार्शच्या घोट्याला दुखापत झाली आहे. स्टॉयनिस आणि मार्श यांना झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान या दुखापती झाल्या होत्या. तिघांच्याही दुखापती जास्त गंभीर नाहीत, तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी20 विश्वचषकापूर्वी कसलीही जोखीम न घेण्याच्या हेतूने त्यांना भारताविरुद्ध न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात आता या तिघांच्या जागी नाथन एलिस, डॅनियल सॅम्स आणि सिन ऍबॉट याला जागा देण्यात आली आहे.
On our way to #India 🇮🇳 pic.twitter.com/SJq2IeJviS
— Pat Cummins (@patcummins30) September 14, 2022
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अपडेटेड ऑस्ट्रेलिया संघ:
सिन ऍबॉट, ऍश्टन ऍगर, पॅट कमिन्स, टिम डेविड, नॅथन एलिस, ऍरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ऍडम झम्पा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | टी20 विश्वचषकासाठी बूम बूम बुमराह सज्ज, तास-न्-तास करतोय सराव
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाच्या 5 वेळच्या विश्वविजेत्या क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
अंपायर रौफ यांच्यावर ओढावली होती चपला विकण्याची वेळ, आता अचानक घेतला जगाचा निरोप