ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा पॅट कमिन्स आगामी मालिकेसाठी तयार आहे. ऑस्ट्रेलिया संघ पुढच्या महिन्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स ही मालिका जिंकण्यासाठी कुठलीच कसर बाकी ठेऊ इच्छित नाही, असेच सध्या पाहायला मिळते. रविवारी (8 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर पॅट कमिन्स माध्यमांशी बोलत होता.
माध्यमांशी बोलत असताना कमिन्सने भारत दौऱ्यासाठी त्यांच्या संघाची रणनीती सांगितली. कर्णधाराच्या मते नाथन लायन, तसेच ऍश्टन एगर आणि ट्रेविस हेट ऑस्ट्रेलियासाठी आगामी कसोटी मालिकेत महत्वाची भूमिका पार पाडली. दक्षिण आफ्रिका संघाला कसोटी मालिकेत 2-0 अशी मात दिल्यानंतर पॅट कमिन्स (Pat Cummins) म्हणाला की, “भारताविरुद्धची मालिका मोठी आहे आणि आम्ही आमचा सर्वश्रेष्ठ संघ याठिकाणी उतरवू इच्छितो. एस्टन एगर डावखुरा फिरकी गोलंदाज आहे आणि तो भारत दौऱ्यावर नक्कीच जाणार आहे. आम्ही त्याला ट्रायलसाठी संघात ठेवले होते. भारतातील खेळपट्टी वेगळी आहे आणि त्याठिकाणी असे गोलंदाज संघासाठी खूपच उपयुक्त ठरतात.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 9 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एश्टन एगरला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले होते. एगरने या सामन्यात 22 षटकांमध्ये 58 धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. पण कमिन्सच्या मते एगरसारख्या गोलंदाजांना भारतीय खेळपट्टीवर फायदा मिळतो.
किमन्स पुढे बोलताना म्हणाला की, “ट्रेविस हेड वेगळ्या पद्धतीचा ऑफ स्पिनर आहे आणि तो आमच्या संघासाठी खूप महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. मी त्याच्या प्रदर्शनावर खुश आहे आणि तो भारत दौऱ्यात संघाचा भाग असेल.” सिडनी कसोटी सामन्यात अष्टपैलू कॅमरून ग्रीन खेळू शकला नाही. ग्रीनच्या हाताच्या बोडाला दुखापत झाल्यामुळे तो संघातून बाहेर झाला, पण भारत दौऱ्यापूर्वी तो पूर्णपणे ठीक होईल, असे सांगितले जात आहे. “ग्रीन सहाव्या क्रमांवर फलंदाजी करतो, त्यामुळे संघात तीन वेगवान गोलंदाज उतरवण्याची संधी आम्हाला मिळते,” असेही पॅट कमिन्स पुढे बोलताना म्हणाला. (Australia team will come with this strategy in India tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुर्दैवी अपघातात प्रसिद्ध रेसरचे निधन! पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
“सूर्यकुमार पाकिस्तानमध्ये जन्मला असता तर…”, माजी कर्णधाराचा पीसीबीवर अप्रत्यक्ष निशाणा