आगामी काळात ऍशेस मालिका खेळली जाणार असून त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन एका शस्त्रक्रियेला सामोरे जाणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या मालिकेला दोन्ही देशांमध्ये खूप महत्व आहे. विश्वचषक जिंकल्याप्रमाणेच ही मालिका जिंकेणे दोन्ही संघांसाठी कौतुकाचे असते. याच करणामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालिकेआधी पूर्ण फिट राहण्याचा प्रयत्न करतात. कर्णधर टिम पेनचाही तोच प्रयत्न आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन डिसेंबरमध्ये इंंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेआधी त्याच्या मानेच्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी शस्त्रक्रिया करणार आहे. शस्त्रक्रियेनंतर तो ऍशेस मालिकेसाठी संघाच्या सराव सत्रात सामील होण्यासाठी फिट होईल अशी त्याला खात्री आहे. ही शस्त्रक्रिया त्याच्या मानेच्या नसांच्या वेदना थांबवण्यासाठी केली जाणार आहे. त्याच्या या वेदनांमुळे त्याला तस्मानियासोबत सराव सत्रात सहभागी होता येणार नाही.
पेनने याबबाद माहिती दिली आहे, तो म्हणाला, “स्पायनल सर्जन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियच्या मेडिकल टीममध्ये सहमती होती की, शस्त्रक्रिया केली गेली पाहिजे. यामुळे उन्हाळ्यातील सत्राच्या पूर्व तयारीसाठी खूप मिळू शकेल. मी या महिन्याच्या शेवटीपर्यंत शारीरिक हालचाली पुन्हा सुरू करण्याची आणि ऑक्टोंबरमध्ये पूर्णपणे प्रशिक्षण सुरू करण्याची आशा करत आहे. मी पहिल्या कसोटी सामन्यात भाग घेण्यासाठी तयार राहील.”
ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्याची सुरुवात ८ डिसेंबरला होणार असून मालिकेतील शेवटचा सामना १८ जानेवारीपर्यंत खेळला जाणार आहे. या मालिकेदरम्यान दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळले जातात. पहिला सामना ८ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार असून दुसरा सामना १६ डिसेंबरपासून ऍडिलेडमध्ये खेळला जाणार आहे.
बाॅक्सिंग डे सामना नेहमीप्रमाणे मँचेस्टरमध्ये २६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. ५ जानेवारीला सिडनीमध्ये चौथ्या कसोटीला सुरूवात होणार असून मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १४ जानेवारीपासून पर्थ स्टेडियमवर खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
खेळ जुना, पण गडी नवे! आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ‘असे’ आहेत सर्व संघ
आरसीबीमध्ये सामील झालेल्या पाच नव्या भिडूंबद्दल विराट म्हणाला…
टी२० विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होणारे संघ, भारत ‘या’ क्रमांकावर