भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाबरोबरच भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हाताला झालेल्या दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित सर्व सामन्यातून बाहेर झाला आहे. यापूर्वी दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा व भुवनेश्वर कुमार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाले होते. त्यामुळे शमीची दुखापत ही संघासाठी गंभीर बाब बनलेली आहे. शमीच्या अनुपस्थितीत या ३ वेगवान गोलंदाजांना आपल्या पदार्पणाची संधी मिळू शकते.
१. मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराज हा शमीची जागा घेण्यासाठी सर्वात अनुकूल खेळाडू असल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात त्याने उत्तम गोलंदाजी केली होती. मोहम्मद शमीप्रमाणेच सिराजकडेही वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येदेखील त्याने उत्तम गोलंदाजी केली आहे. सिराजने खेळलेल्या ३८ प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यात तब्बल १५२ बळी मिळवले आहेत. यात ५९ धावा देत ८ बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी देखील तो उत्तम गोलंदाजी करेल अशी सर्वांना अशा आहे.
२. नवदीप सैनी
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात नवदीप सैनी यानेही उत्तम गोलंदाजी केली होती. नवदीप सैनीकडे बाऊंसर हे एक उत्तुंग शस्त्र आहे. सैनीने खेळलेल्या ४६ प्रथम श्रेणी सामन्यात १२८ बळी मिळवले आहेत. शमीची जागा घेण्यास सैनी देखील योग्य खेळाडू ठरू शकतो.
३. टी नटराजन
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये नटराजनने उत्तम गोलंदाजी केली होती. नटराजनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २० सामन्यात ६४ बळी मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये समाविष्ट होण्यासाठी नटराजनची सर्वात जमेची बाजू आहे त्याचा फॉर्म. नटराजन सध्या उत्तम गोलंदाजी करत असल्यामुळे त्याला देखील शमीच्या जागी भारतीय संघात समाविष्ट केले जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ …तर भारतीय संघाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळू शकतो’, गावसकरांचा इशारा
भल्या भल्यांना न जमणाऱ्या स्टाईलने करतो ‘हा’ खेळाडू फलंदाजी; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित
कर्णधारपद नको रे बाबा…! पूर्णवेळ कसोटी कॅप्टन बनण्यास दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूचा नकार