भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची मालिकेतील तिसरा कसोटी गुरुवारपासून(7 जानेवारी) सुरु झाला आहे. हा सामना सिडनीत क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का डेविड वॉर्नरच्या रुपाने बसला. तो डावाच्या चौथ्या षटकात 5 धावांवर बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने चेतेश्वर पुजाराकडे झेल देण्यास भाग पाडले.
6 वर्षानंतर पहिल्यांदा डेविड वॉर्नर सिडनीत अपयशी ठरला.
डेविड वॉर्नरला सिडनीचे मैदान कसोटीसाठी नेहमी आवडीचे ठरले आहे. कारण हे त्याचे घरचे मैदान आहे. डेविड वॉर्नर या मैदानावर 9 कसोटी सामने खेळताना 14 डावात दोन वेळा नाबाद राहिला आहे. त्याचबरोबर त्याने 741 धावा काढल्या आहेत. त्याने या मैदानावर चार शतके आणि तीन अर्धशतके ठोकली आहेत.
परंतु, गुरुवारी 5 धावांवर बाद झाल्याने मागील सहा वर्षाच्या कालावधीनंतर डेविड वॉर्नर पहिल्यांदाच दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. मागील 6 वर्षात खेळल्या गेलेल्या 5 कसोटी सामन्यात डेविड वॉर्नरने प्रत्येक सामन्यात कमीत कमी एक अर्धशतक किंवा शतक तरी ठोकले आहे.
जेव्हा 2014-15 मध्ये भारताने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. तेव्हा डेविड वॉर्नरने सिडनीत पहिल्या डावात 101 धावा आणि दुसर्या डावात 4 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर 2015-16 मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध डेविड वॉर्नरने 122 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर 2016 – 17 साली पाकिस्तान विरुद्ध त्याने या मैदानावर 113 आणि 55 धावांची खेळी केली होती. तसेच 2017-18 मध्ये ऍशेज मालिकेत या मैदानावर 53 धावांची खेळी साकारली होती.
न्यूझीलंड विरुद्ध 2019-20 साली झालेल्या सामन्यात डेविड वॉर्नरने 45 आणि 111 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे आता बघावे लागेल की तो दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करून सातत्य राखण्याचा प्रयत्न करतो की नाही.
दुखापतीनंतर पुनरागमन –
डेविड वॉर्नरने मांडीच्या दुखापतीतून सावरत तिसर्या कसोटी सामन्यात पुनरागमन केले होते. तो भारताविरुद्ध वनडे मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला टी20 मालिकेत आणि कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळता आले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी! सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; घरी परतताना दिली ‘ही’ प्रतिक्रिया
व्हिडिओ : राष्ट्रगीत सुरु असतानाच मोहम्मद सिराज झाला भावूक; अश्रूही झाले अनावर
‘धोकादायक’ डेविड वॉर्नरला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने केले जोरदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ