भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ गडी राखून पराभव केला आहे. दुसऱ्या दिवस अखेर सामन्यात आघाडीवर असणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात केवळ ३६ धावांवर बाद केले. भारतीय संघाला कमी धावसंख्येवर रोखण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती जोश हेजलवूडने. भारताच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना हेजलवूडने आपल्या ५ षटकांत केवळ ८ धावा देत तब्बल ५ खेळाडूंना बाद केले. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना हेजलवूडने आपल्या रणनीतीचा उलगडा केला आहे.
सुरुवातीपासूनच योग्य ठिकाणी केला मारा
सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना हेजलवूड म्हणाला, “मी प्रत्येक वेळी गोलंदाजी करताना माझ्या पूर्ण क्षमतेचा वापर करतो. या वेळी मी चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूपासून उत्तम गोलंदाजी केल्याने फायदा होतो. जर सुरुवातीचे एक- दोन चेंडू योग्य ठिकाणी पडले नाहीत, तर फलंदाज आक्रमक फटके मारतात व गोलंदाज दबावात येतात. परंतु मी सुरुवातीपासून योग्य ठिकाणी टप्पा ठेवल्याने मला फायदा झाला.”
गुलाबी चेंडूने खेळणे आव्हानात्मक
गुलाबी चेंडूबद्दल बोलताना हेजलवूड म्हणाला, “गुलाबी चेंडू व लाल चेंडूत फरक आहे. गुलाबी चेंडूत रात्रीच्या वेळी फलंदाजी करणे फार आव्हानात्मक आहे. मागील सामन्यांपेक्षा या सामन्यात खेळपट्टीवर गवत थोडे जास्त होते व त्याचा गोलंदाजांना फायदाच झाला.”
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचे भविष्य ‘या’ माजी खेळाडूच्या हाती; सांभाळणार मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी
फ्लॉप शोनंतरही ‘हा’ माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज देतोय पृथ्वी शॉला पाठिंबा, काय आहे यामागचं कारण
दुसऱ्या कसोटीत भारतासाठी ‘हा’ खेळाडू ठरू शकतो मोठा ‘गेमचेंजर’, ऑसीच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
‘या’ तीन दिग्गज खेळाडूंची मुले, भविष्यात करू शकतात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व
भारतीय संघाचे ६ धडाकेबाज खेळाडू, ज्यांनी २०२० मध्ये केले क्रिकेटला ‘बाय बाय’