दक्षिण आफ्रिका विरुद्ध आॅस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात आज अाफ्रिकेने ४९२ धावांनी विजय मिळवत ४ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ने जिंकली. चौथ्या डावात ६१२ धावांचे लक्ष दिलेल्या आॅस्ट्रेलियाचा डाव ११९ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे आफ्रिकेला ४९२ धावांनी मोठा विजय मिळाला.
हा सामना माॅर्ने माॅर्केलचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने ह्या सामन्यात ३ विकेट्स घेऊन क्रिकेटला अलविदा केले. यावेळी त्याचे वडील, पत्नी आणि मूले उपस्थित होती.
आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात केवळ पीटर हॅंड्सकाॅंब (२४) आणि जो बर्न्स (४२) यांनी दुहेरी धावसंख्या उभारली.
याबरोबर आफ्रिका तिसऱ्यांदा घरच्या मैदानावर आॅस्ट्रलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. हा कसोटी क्रिकेटमधील धावांच्या फरकाने चौथा मोठा विजय ठरला.
संक्षिप्त धावफलक:
दक्षिण आफ्रिका: पहिला डाव ४८८ आणि दुसरा डाव ६ बाद ३४४ घोषीत
आॅस्ट्रेलिया: पहिला डाव २२१ आणि दुसरा डाव सर्वबाद ११९
दक्षिण आफ्रिका ४९२ धावांनी विजयी.