ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यावरून क्रिकेटवर्तुळात नव्या वादाला सुरूवात झाली आहे. पाच दिवसांचा हा सामना केवळ दोनच दिवसात कसा काय संपतो, असे प्रश्न विचारले जात आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ब्रिसबेनच्या गाबावर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हा सामना शनिवारी (17 डिसेंबर) सुरू झाला होता आणि रविवारी (18 डिसेंबर) तो संपला यामुळे भारताचा दिग्गज चांगलाच भडकला आहे.
वेगवान गोलंदाजीसाठी पूरक असलेल्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याला 4 विकेट्स मिळाल्या, तर बाकी 30 विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. मालिकेच्या पहिल्याच सामन्यात अशा प्रकारचा निकाल पाहायला मिळाल्याने भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने आपला राग इंस्टाग्रामवर पोस्ट करत व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्याने एक ट्वीटही केले जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सेहवागने ऑस्ट्रेलियाच्या दुटप्पीपणावर टिका केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी जी खेळपट्टी तयार केली त्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्याने सोशल मीडियावर उघडपणे त्याची बाजू मांडली आहे.
सेहवागने ट्वीटमध्ये लिहिले, ‘142 षटके आणि 2 दिवसही सामना खेळला गेला नाही आणि हे लोक कशा प्रकारच्या खेळपट्ट्या बनवल्या पाहिजेत यावर सल्ला द्यायला नेहमीच पुढे असतात. असे जर भारतात झाले तर कसोटी क्रिकेटचा संपले, कसोटी क्रिकेटला काळीमा फासला असे अनेक काही म्हणतात. त्यांचे विचार समजणे अवघड आहे.’
142 overs and not even lasting 2 days and they have the audacity to lecture on what kind of pitches are needed. Had it happened in India, it would have been labelled end of test cricket, ruining test cricket and what not. The Hypocrisy is mind-boggling . #AUSvSA
— Virender Sehwag (@virendersehwag) December 18, 2022
त्याचबरोबर सेहवागने इंस्टाग्रामवर लिहिले, ‘त्वाडा कुत्ता कुत्ता, सांडा कुत्ता टॉमी’
https://www.instagram.com/p/CmTSxNAJX1X/?utm_source=ig_web_copy_link
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 152 धावसंख्येवरच गुंडाळला. त्याबदल्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 218 धावा केल्या. दुसऱ्या डावात तर पाहुण्या संघाने हद्दच केली. ते केवळ 99 धावसंख्याच उभारू शकले. ज्यामुळे यजमानांना जिंकण्यासाठी 34 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी 7.5 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तर 19 धावा अतिरिक्तच होत्या. Australia vs South Africa First Test Virender Sehwag Tweet & Instagram Post Goes viral
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऐतिहासिक विजयाची दक्षिण आफ्रिकेला हुलकावणी! ब्रिस्बेन कसोटीत दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघर्षपूर्ण विजय
एसएफए अजिंक्यपद स्पर्धेत पीआयसीटी मॉडेल स्कुल संघाला विजेतेपद; जैनम, राजलक्ष्मी यांची लक्षवेधी कामगिरी