मेलबर्न। ऑस्ट्रेलिया संघाने ७२ व्या ऍशेस मालिकेच्या (ASHES SERIES) तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला मंगळवारी तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि १४ धावांनी पराभूत केले. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या ऍशेस मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेत मानाची ऍशेस ट्रॉफी आपल्याकडेच राखली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात (Australia vs England) मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेला हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना (Boxing Day Test) होता. या तिसऱ्या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक राहिला तो पदार्पणवीर स्कॉट बोलंड. त्याने या सामन्यात एकूण ७ विकेट्स घेतल्या. यातील ६ विकेट्स त्याने दुसऱ्या डावात घेतल्या. त्याने दुसऱ्या डावात सर्वोत्तम कामगिरी करताना ४ षटकात ७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
Australia retain the #Ashes 👏
They take an unassailable 3-0 lead in the series after a scintillating display in Melbourne 🙌#AUSvENG | #WTC23 | https://t.co/QKpJv6yy6n pic.twitter.com/nbzHqO184m
— ICC (@ICC) December 28, 2021
इंग्लंडचा संघ ६८ धावांत गारद
तिसऱ्या दिवसाची सुरूवात इंग्लंडने दुसऱ्या डावातील १२ षटकांपासून आणि ४ बाद ३१ धावांपासून पुढे केली. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ तग धरता आला नाही. दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेला अष्टपैलू बेन स्टोक्सला ११ धावांवर मिशेल स्टार्कने त्रिफळाचीत केले आणि इंग्लंडच्या डावाला गळती लागली. त्यानंतर एकापाठोपाठ एक फलंदाज बाद झाले.
जॉनी बेअरस्टोला ५ धावांवर, जो रूटला २८ धावांवर आणि मार्क वूडला शुन्यावर शुन्यावर बाद करत बोलंडने इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर टाकले. यानंतर इंग्लंडसाठी पुनरागमन करणे कठीण झाले. अखेर ऑली रॉबिन्सन शुन्यावर आणि जेम्स अँडरसन २ धावांवर बाद झाल्याने इंग्लंडचा दुसरा डाव २७.४ षटकात ६८ धावांवरच संपुष्टात आला. जॉस बटलर ५ धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून बोलंडने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या, तर मिशेल स्टार्कने ३ विकेट्स घेतल्या आणि कॅमेरॉन ग्रीनने १ विकेट घेतली.
अधिक वाचा – विश्वचषक आणि ऍशेस जिंकवूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया हटविणार कोच लँगरला? वाचा सविस्तर
ऑस्ट्रेलियाने मिळवलेली ८२ धावांची आघाडी
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव ६५.१ षटकांत केवळ १८५ धावांवरच संपुष्टात आणला. इंग्लंडकडून केवळ कर्णधार जो रूटने चांगली झुंज दिली. त्याने ५० धावांची खेळी केली. मात्र, अन्य कोणत्या फलंदाजाला फार खास काही करता आले नाही.
ऑस्ट्रेलियाकडून या डावात पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच मिशेल स्टार्कने २ विकेट्स घेतल्या, तर स्कॉट बोलंड आणि कॅमेरॉन ग्रीनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
व्हिडिओ पाहा – बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही… |
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडूनही मार्कस हॅरिसव्यतिरिक्त कोणत्या प्रमुख फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मात्र, त्यांच्या संघातील खेळाडूंनी छोटेखानी खेळ्या करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ८७.५ षटकात सर्वबाद २६७ धावांपर्यंत पोहचवले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ८२ धावांची आघाडी मिळाली.
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्कस हॅरिसने सर्वाधिक ७६ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नरने ३८ धावांची खेळी केली. तसेच तळात कर्णधार पॅट कमिन्सने २१ आणि मिशेल स्टार्कने २४ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. याशिवाय बेन स्टोक्स आणि जॅक लीचने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
”स्टोक्समध्ये ती बात राहिली नाही”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उडविली खिल्ली
इंग्लंडच्या ३९ वर्षीय खेळाडूची कमाल ! सूपरमॅन स्टाईलमध्ये केला झेलाचा ‘अविश्वसनीय’ प्रयत्न
युवा अफगाण फलंदाजाने केली भारताच्या ‘दादा’ गोलंदाजांची धुलाई; एकाच षटकात बदलून टाकले आकडे