सध्या भारतीय क्रिकेट संघांना सातत्याने पराभवास सामोरे जावे लागत आहे. बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या पुरुष संघाला वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही पराभूत व्हावे लागले आहे. ऑस्ट्रेलिया संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील या पहिल्या सामन्यात भारताचा तब्बल 9 गडी राखून पराभव केला. बेथ मूनी हिने झळकावलेले नाबाद अर्धशतक ऑस्ट्रेलियाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.
A dominant batting display gives Australia a 1-0 lead in the series 🙌#INDvAUS | https://t.co/03vPFwrpgb pic.twitter.com/qczQ5vcw5q
— ICC (@ICC) December 9, 2022
मुंबई येथील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेलेल्या या सामन्यात हरमनप्रीत कौर हीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आक्रमक सलामीवीर शफाली शर्माने 10 चेंडूवर 21 धावा चोपत चांगली सुरुवात दिली. जेमिमा रॉड्रिग्ज खातेही खोलू शकली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मंधाना या दोघी देखील चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकल्या नाहीत.
त्यानंतर डावाची जबाबदारी युवा यष्टीरक्षक रिचा घोष हिने खांद्यावर घेतली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत 20 चेंडूवर 36 धावा कुटल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दीप्ती शर्मा हिने आणखी आक्रमक धोरण स्वीकारत 16 चेंडूवर नाबाद 36 धावा करत भारताला 5 बाद 172 अशी मोठी मजल मारून दिली.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकला. कर्णधार एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी 53 चेंडूवर 73 धावा चोपल्या. हिली बाद झाल्यानंतर मूनीला तहिला मॅकग्राने तशीच तोलामोलाची साथ दिली. भारतीय क्षेत्रक्षकांकडून मिळालेल्या वारंवार जीवदानाचे रूपांतर मूनीने मोठ्या खेळीत केले. तिने अखेरपर्यंत नाबाद राहत 57 चेंडूंवर 89 तर मॅकग्राने 29 धावा केल्या. यासह भारतीय संघ मालिकेत 1-0 असा पिछाडीवर पडला आहे.
(Australia Womens Beat India Womens In First T20I By 9 Wickets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो अनुभवी कर्णधार नाही…’, केएल राहुलच्या नेतृत्वाबद्दल भारताच्या माजी सलामीवीराचे खळबळजनक वक्तव्य
महिला आयपीएलमधूनही उघडणार कुबेराचा खजाना! मिडीया राईट्ससाठी बीसीसीआयने केले टेंडर जारी