वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभूत केले. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. पण दुसऱ्या सामन्यात भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यानंतर वनडे मालिका 1-1 अशा बरोबरीवर आली आहे. दरम्यान, रविवारी (19 मार्च) खेळल्या गेलेल्या या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने एक नकोसा विक्रम नावावर केला.
वनडे क्रिकेटच्या इतिहिसात भारत एक बलाढ्य संघ म्हणून नेहमीच ओळखला गेला. पण काही सामने असेही राहिले, ज्यामध्ये भारतीय संघ स्वस्तात बाद झाला आणि विरोधी संघ खूपच लवकर विजयी झाला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात रविवारी भारतीय संघाने सर्वात जलद पराभव स्वीकारला. यापूर्वी 2019 आणि 2010 साली भारताला अशाच पद्धतीने स्वस्तात पराभव स्वीकारावा लागला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने अवघ्या 11 षटकांमध्ये एकही विकेट न गमावता विजय मिळवला. भारतीय संघाविरुद्ध वनडे खेळताना यापूर्वी कोणाच संघ 11 षटकांमध्ये लक्ष्य गाठू शकला नव्हता. यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील 2019 साली झालेला वनडे सामना आहे. या सामन्यात न्यूझीलंडने अवघ्या 14.4 षटकांमध्ये विजय मिळवला होता. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंका संघ आहे. श्रीलंकन संघाने 2010 मध्ये भारताविरुद्धच्या वनडेत अवघ्या 15.1 षटकात लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला होता.
वनडे क्रिकेटमध्ये भारताविरुद्धच्या सर्वात कमी षटकात विजय मिळवणारे संघ
ऑस्ट्रेलिया – 11.0 षटकांमध्ये (2023)
न्यूझीलंड – 14.4 षटकांमध्ये (2019)
श्रीलंका – 15.1 षटकांमध्ये (2010)
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या दुसऱ्या वनडेचा एकंदरीच विचार केला, तर मिचेल स्टार्क (Mitchell Starc) सामन्याचा हिरो राहिला. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. पहिल्यांदा फलंदाजीला आल्यानंतर भारताने 26 षटकात 117 धावा केल्या आणि सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने अवघाया 11 षटकांमध्ये विजय मिळवसा. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 22 मार्च रोजी खेळला जाणार आहे.
(Australia won in the shortest number of overs against India in ODI cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घरच्या मैदानावर टीम इंडियाचा नामुष्कीजनक विक्रम! भारताच्या वनडे इतिहासात चौथ्यांदाच असं घडल
दुसऱ्या वनडेत टीम इंडिया चारीमुंड्या चीत! ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 11 षटकात 10 विकेट्सने रेकॉर्डब्रेक विजय