---Advertisement---

CWG 2022 | ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान ४४ धावांनी पराभूत; स्पर्धेतूनही बाहेर

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 7:19 PM
Tahila-McGrath
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यात बुधवारी (०३ ऑगस्ट) कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील नववा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फलंदाजी आणि गोलंदाजीत धडाकेबाज प्रदर्शन करत पाकिस्तानवर सोपा विजय मिळवला. ४४ धावांच्या फरकाने हा अखेरचा साखळी फेरी सामना जिंकत ऑस्ट्रेलिया संघ गट अ मधून उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. तर पाकिस्तानचा संघ सलग तिसऱ्या पराभवासह या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

या सामन्यात (Australia vs Pakistan) प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात २ विकेट्सच्या नुकसानावर १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २० षटकात ८ विकेट्स गमावत ११६ धावाच करू शकला.

ऑस्ट्रेलियाच्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाज सपशेल अपयशी ठरल्या. पाकिस्तानकडून फातिमा सना हिने सर्वाधिक नाबाद ३५ धावा केल्या. या खेळीसाठी तिने २६ चेंडू खेळताना २ षटकार व २ चौकार मारले. तर ओमायमा सोहेल आणि कर्णधार बिस्माह मरूफ यांनीही प्रत्येकी २३ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानच्या ७ फलंदाज तर एकेरी धावेवरच बाद झाल्या.

तर ऑस्ट्रेलियाकडून या डावात तहिला मॅकग्राथ (Tahila McGrath) हिने प्रशंसनीय गोलंदाजी केली. ३ षटके फेकताना १३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच मेगन शट, डार्सी ब्राउन, जेस जोनासन आणि एलाना किंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

https://twitter.com/ICC/status/1554814225746432000?s=20&t=Ad2_JJBy46o8S_xQNrhF5A

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर बेथ मूनी हिने सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करताना तिने वादळी अर्धशतक केले. ४९ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ८ चौकारांच्या साहाय्याने तिने नाबाद ७० धावा फटकावल्या. तसेच तहिला मॅकग्राथनेही नाबाद ७८ धावांचे योगदान दिले. ५१ चेंडूंमध्ये १ षटकार आणि १० चौकार मारत तिने ही प्रशंसनीय खेळी केली होती.

दरम्यान गट अ मधून ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर आता दुसरा संघ संध्याकाळी (१०.३० वाजता) होणाऱ्या भारत विरुद्ध बार्बाडोस सामन्यातून ठरेल. हा सामना जिंकणारा संघ गट अ मधून उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरेल. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

जबरदस्त फॉर्ममध्ये आहे दिनेश कार्तिक; तरीही माजी दिग्गज म्हणतोय, ‘तो फिनिशर नाही’

विराट कोहलीच्या कारकिर्दीला उतरती कळा..! टी२० क्रमवारीत ८ वर्षांतील सर्वात वाईट स्थानी घसरण

थेट हृदयावर वार! झंझावाती अर्धशतकानंतर सूर्यकुमारची मन जिंकणारी कृती, Video व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---