गुरुवारी (7 सप्टेंबर) मार्नल लॅबुसेन ऑस्ट्रेलियन संघासाठी हिरो ठरला. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळलेल्या पहिल्या वनडे सामन्यात लॅबुशेनने 93 चेंडूत सर्वाधिक 80 धावांची खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात ऍश्टन एगर याचेही महत्वाचे योगदान दिले. गोलंदाजी विभागात जोश हेजलवूडने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. वनडे मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्स राखून जिंकला.
यजमान दक्षिण आफ्रिका संघाला या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. ऑस्ट्रेलियाने घेतलेला प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करतना आफ्रिकी संघ 222 धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार टेंबा बावूमा याचे शतक (114) यासाठी महत्वपूर्ण ठरले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 40.2 षटकांमध्ये 223 धावांचे लक्ष्य गाठले आणि मालिकेत 0-1 अशी आघाडीही घेतली. मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) याने 93 चेंडूत 80 धावांची खेळी केली.
विशेष म्हणजे लॅबुशेन या प्लेइंग इलेव्हनचा भाग नेव्हता. पण चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या कॅमरून ग्रीनला कॅगिसो रबाडा याचा बाऊंसर चेंडू लागल्यामुळे तो राटायर्ड हर्ट झाला. अशात आफ्रिकेची पाचवी विकेट गेल्यानंतर लॅबुशेन फलंदाजीला आला आणि सर्वाधिक धावा केल्या. त्यापाठोपाठ ऍश्टन एगर याने संघासाठी 48 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडा आणि जोराल्ड कोएल्ड यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
The super sub!! 🔁
Brought into the game under unfortunate circumstances, Marnus Labuschagne steers the Aussies to a remarkable victory in Bloemfontein #SAvAUS pic.twitter.com/ItdvmsRzvo
— cricket.com.au (@cricketcomau) September 7, 2023
(Australia won the first ODI against South Africa by 3 wickets)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर डुसेन, ऍडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एन्गडी , कागिसो रबाडा.
ऑस्ट्रेलिया – ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शॉन ऍबॉट, ऍश्टन एगर, जोश हेझलवूड, ऍडम झाम्पा.