---Advertisement---

ऍडम झंपा ठरला स्टार! चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियासाठी जिंकला सामना, मालिकाही केली नावावर

On: रविवार, सप्टेंबर 10, 2023 1:53 AM
Australia Team
---Advertisement---

शनिवारी (9 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना पार पडला. पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यात 123 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 0-2 अशी विजयी आघाडी घेतली. मार्नस लॅबुशेन सामनावीर ठरला. लॅबुशेनने 99 चेंडूत 124 धावांची खेळी केली. गोलंदाजी विभागातून ऍडम झंपा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 392 धावा कुटल्या. या धावा करण्यात मार्नस लॅबुशेन याच्यासह सलामीवीर डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांचेही योगदान महत्वाचे राहिले. वॉर्नर याने 93 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी केली. तर ड्रेविस हेड याने अवघ्या 36 चेंडूत 64 धावा कुटल्या. जोस इग्लिस याने 37 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेसाठी तबरेझ शम्सी याने सर्वाधिक 4 विकेट्स गेतल्या. आफ्रिकी संघाला विजयासाठी 50 षटकांमध्ये 393 धावांचा डोंकर पार करायचा होता, जो त्यांना जमला नाही.

दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉक (45) आणि कर्णधार डेंबा बावुमा (46) यांनी चांगली सुरुवात दिली. त्यानंतर मध्यक्रमात हेनरिक क्लासेन आणि डेविड मिलर यांनी संघासाठी प्रत्येकी 49-49 धावांची खेळी केली. पण या चौघांच्या महत्वपूर्ण खेळीनंतरही आफ्रिकी संघ हे मोठे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. (Australia won the second ODI against South Africa )

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन – 
ऑस्ट्रेलिया – ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इग्लिस, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, ऍरॉन हार्डी, शॉन ऍबॉट, नॅथन एलिस, ऍडम झंपा.

दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रासी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्ट, तबरेझ शम्सी.

महत्वाच्या बातम्या – 
आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत आरव माथूर, विराज देवरा, विनय शिंदे, अरमान चौधरी यांची आगेकूच
वेलडन क्विनी! झंझावाती 45 धावांसह डी कॉकने मिळवली सहा हजारी क्लबमध्ये जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---