ऍडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज दुसरा वनडे सामना ऍडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. आज या सामन्यात मोहम्मद सिराजला खलील अहमद ऐवजी संघात स्थान मिळाले आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघात एकही बदल करण्यात आलेला नाही. सिडनी वनडेत खेळलेला 11 जणांचा ऑस्ट्रेलियाचा संघ ऍडलेड वनडेसाठी कायम करण्यात आलेला आहे.
हा सामना भारतीय संघासाठी करो या मरोचा सामना आहे. कारण ऑस्ट्रेलियाने सिडनी येथे झालेला पहिला वनडे सामना 34 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलिया मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचा प्रयत्नात असेल.
असे आहेत 11 जणांचे संघ-
भारत – रोहित शर्मा(उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली(कर्णधार), अंबाती रायडू, एमएस धोनी, दिनेश कार्तिक,रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
Our Playing XI for the game. Mohammed Siraj makes his ODI debut for #TeamIndia. pic.twitter.com/HpKhkyGa0P
— BCCI (@BCCI) January 15, 2019
ऑस्ट्रेलिया – ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍलेक्स कॅरे(उपकर्णधार), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नॅथन लायन, पीटर सिडल, झे रिचर्डसन, जेसन बेऱ्हेनडॉर्फ.
AUS XI: A Carey, A Finch, U Khawaja, S Marsh, P Handscomb, M Stoinis, G Maxwell, J Richardson, N Lyon, P Siddle, J Behrendorff
— BCCI (@BCCI) January 15, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रॅक्टिसमध्ये खेळलेले लाखो बाॅल आले कामाला, थेट झाला टीम इंडियाचा सदस्य
–२०१८मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एबी खेळणार २०१९मध्ये या संघाकडून
–एएफसी आशियाई करंडक- बहरिन विरुद्धचा सामना भारतासाठी अतिशय महत्त्वाचा