fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आॅस्ट्रेलियाकडून पुन्हा रडीचा डाव, आता कोहली निशाण्यावर

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या डावात 166 धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आला.

याआधी नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी सर्वबाद 250 धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वरच्या फलंदाजी फळीचीही भारतासारखीच अवस्था झाली होती.

ऑस्ट्रेलियाच्या विकेट जात असताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने आक्रमकपणे सेलिब्रेशन करताना दिसला. त्याच्या या प्रतिक्रियेवर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“जर आमच्या खेळाडूंनीही कोहलीप्रमाणे जल्लोष केला असता तर त्यांना नावे ठेवली असती,” असे लॅंगर फॉक्स स्टारशी बोलताना म्हणाले. तसेच त्यांनी सचिन तेंडुलकरच्या ट्विटवरही खेद दर्शवला.

भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियावर राखलेले वर्चस्व कायम ठेवायला हवे. तसेच मी आतापर्यत ऑस्ट्रेलियाची अशी बचावात्मक फलंदाजी पाहिली नाही, असे ट्विट सचिनने केले होते.

“सचिन ज्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळला. त्यात रिकी पॉटींग, अॅलन बॉर्डर, डेव्हिड बून, स्टिव्ह वॉ आणि मार्क वॉ असे खेळाडू होते. सध्याच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कसोटी क्रिकेटचा तेवढा अनुभव नाही”, असे म्हणत लॅंगर यांनी उत्तर दिले.

कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक विकेटवर त्याच्या पद्धतीने जल्लोष केला. जर अशाच प्रकारचा आनंद ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केला असता तर त्यांच्याबद्दल चर्चा झाली असती.

“कोहली हा या खेळाचा बादशहा आहे. चाहते त्याला क्रिकेट खेळताना बघत असतात तसेच चर्चाही करतात. एक कर्णधार म्हणून त्याने जरा काही मर्यादा ठेवाव्यात”, असेही लॅंगर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: तिसऱ्या दिवसाखेर भारताकडे १६६ धावांची आघाडी

विराट कोहलीची कसोटीमध्ये या गोलंदाजाने केली आहे सर्वाधिक वेळा शिकार

असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय

You might also like