भारतीय संघाने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. हा विजय मिळवताच भारतीय संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव झटपट गुंडाळल्यामुळे भारताचा हा विजय सुकर झाला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्याहून अधिक फलंदाजांनी एकच फटका खेळत भारतीय गोलंदाजांना अक्षरशः विकेट बहाल केल्या.
ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दमदार सुरुवात केली होती. ट्रेविस हेडने आक्रमक नाबाद 40 धावा करत संघाला दिवसाखेर 1 बाद 61 पर्यंत पोहोचवले होते. दुसऱ्या दिवशी आणखी धावा करत भारतासमोर विजयासाठी मोठे लक्ष ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. त्यांनी पहिल्या सत्राच्या आतमध्येच ऑस्ट्रेलियाचे उर्वरित नऊ फलंदाज बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 113 धावांवर संपवला.
या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 20 चेंडूंवर स्वीपचा फटका खेळला. त्यावर त्यांना 29 धावा करण्यात यश आले. मात्र, हा एकच फटका खेळताना ऑस्ट्रेलियाच्या तब्बल सहा फलंदाजांनी आपला बळी गमावला. यामध्ये उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, ऍलेक्स केरी, पॅट कमिन्स व मॅथ्यू कुन्हमन यांचा समावेश होता.
भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना आव्हान द्यायचे असल्यास स्वीप या फटक्याचा वापर सर्वाधिक केला जातो. इंग्लंडचे ग्रॅहम गूच यांनी 1987 वनडे विश्वचषकात या फटक्याने अनेक धावा वसूल केल्या होत्या. तेव्हापासून जवळपास सर्वच विदेशी फलंदाज भारतीय उपखंडात हा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. ऑस्ट्रेलियन संघाने देखील मालिकेआधी याच फटक्याचा भरपूर सराव केला होता. मात्र, त्यांना यात अपयश लाभले आहे.
(Australian Batters Fail To Score On Sweep Shot Jadeja And Ashwin Dominate In Delhi Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियाकडून 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा सुफडा साफ, 36 वर्षांच्या विक्रमाला धक्काही लागला नाही
किंग कोहलीचा भीम पराक्रम! 25000 धावांचा टप्पा पार करताच मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चाही World Record