ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने स्पष्ट केले आहे की, तो बीग बॅश लीगच्या आगामी हंगामात सहभगी होणार नाहीये. ऑस्ट्रेलियन संघाचे चालू वर्षातील वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. जास्त क्रिकेट खेळल्यामुळे दुखापत होऊ शकते आणि याच कारणास्तव तो बीबीएलमधून माघार घेत असल्याचे स्टार्कने स्पष्ट केले. हा निर्णय घेऊन स्टार्कने भारतीय खेळाडूंसमोर एक आदर्श ठेवण्याचे काण नक्कीच केले आहे.
मिचेल स्टार्क (Mitchell Starc) यापूर्वी २०१४-१५ मध्ये सिडनी सिक्सर्स संघासाठी बीग बॅश लीग () खेळला होता. मागच्या अनेक वर्षांप्रमाणेच यावर्षी देखील त्याने या लीगमधून माघार घेतली. या निर्णयाचे कारण सांगताना स्टार्क म्हणाला की, “जेव्हा कधी मी या लीगमध्ये खेळलो आहे, नेहमीच आनंद घेतला आहे. परंतु आयपीएल आणि बीबीएलविषयी माझा दृष्टीकोण वेगळा आहे. मी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे वेळापत्रक पाहिले आणि त्यामुळेच जेवढे होऊ शकेल, तेवढे फिट राहण्याचा आणि चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. अशात फ्रँचायझी क्रिकेट माझ्यासाठी दुसरी प्रथमिकता असेल.”
ऑस्ट्रेलियना संघाच्या आगामी मालिकांचा विचार केला, तर संघाला सध्या सुरू असलेल्या श्रीलंका दौऱ्यानंतर जिम्बाब्वे, न्यूझीलंड, भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध मालिका खेळायच्या आहेत. तसेच चालू वर्षीतील टी-२० विश्वचषक आणि पुढच्या वर्षीचा एकदिवसीय विश्वचषकही संघासाठी महत्वाचा असेल.
दरम्यान, स्टार्कने हेतलेला हा निर्णय भारताच्या कोणत्याही खेळाडसाठी खूप कठीण असेल. कारण भारतीय खेळाडू नेहमीच राष्ट्रीय संघापेक्षा आयपीएलला अधिक महत्व देताना दिसले आहेत. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन नवीन संघाचा समावेश झाला आणि स्पर्धाही लांबली. आयपीएलनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-२० मालिका खेळायची होती. परंतु या मालिकेत भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आणि युवा खेळाडूंना खेळवले गेले.
स्टार्क पहिला खेळाडू नाहीये, ज्याने फ्रँचायझी क्रिकेटऐवजी राष्ट्रीय संघाला महत्व दिले आहे. यापूर्वी अनेकदा विदेशी खेळाडूंनी आयपीएलऐवजी त्यांच्या राष्ट्रीय संघासाठी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षी इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेतीस शेवटचा सामना रद्द केला गेल्यानंतर त्यांच्या अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी रचलाय इतिहास, कसोटी मालिकेत पहिल्यांदाच घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
सिराजच्या झटक्याने इंग्लंडची धुळधान, भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी
पीवायसी रावेतकर फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत सामुराईज, टायटन्स, निंजाज संघांचे विजय