---Advertisement---

आनंदाची बातमी! ग्लेन मॅक्सवेल बनला बापमाणूस, पत्नी विनीने दिला मुलाला जन्म, नाव काय ठेवलंय माहितीये?

On: शुक्रवार, सप्टेंबर 15, 2023 1:38 PM
Glenn-Maxwell-And-Vini-Raman
---Advertisement---

क्रिकेटविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल वडील बनला आहे. त्याची पत्नी विनी रमन हिने मुलाला जन्म दिला आहे. मॅक्सवेलने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आता चाहते आणि क्रिकेटपटू मॅक्सवेलवर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

फोटो केला शेअर
ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांनी दोघांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. या फोटोत बाळासोबतच मॅक्सवेल आणि विनी रमन यांचा हात दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये मुलाच्या जन्माची तारीख आणि त्याचे नाव लिहिले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये “11.09.2023 आणि मुलाचे नाव लोगन मॅव्हरिक मॅक्सवेल (Logan Maverick Maxwell)” असे लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CxNB4ZUP_4X/?utm_source=ig_embed&ig_rid=0867f32d-dd8a-4427-86c3-733bd4407f68

आता या पोस्टवर चाहते आणि कलाकारांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत सर्वजण जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. विराट कोहली याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने कमेंट करत “तुम्हा दोघांचे अभिनंदन” असे लिहिले आहे. याव्यतिरिक्त युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हिनेही कमेंट करत “तुमचे अभिनंदन” लिहिले आहे.

तसेच, इतर क्रिकेटपटूंच्या पत्नीही विनी आणि मॅक्सवेलच्या या फोटोवर कमेंट्स करत त्यांचे अभिनंदन करत आहेत. खरं तर, मॅक्सवेल आणि विनी हे दोघे 2022मध्ये विवाहबंधनात अडकले होते.

वनडे विश्वचषक 2023साठी मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया संघात
येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी ग्लेन मॅक्सवेल याला ऑस्ट्रेलिया संघात सामील करण्यात आले आहे. मॅक्सवेलच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 128 सामने खेळताना 33.88च्या सरासरीने 3490 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 23 अर्धशतकांचाही समावेश आहे.

विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ-
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, ट्रेविस हेड, ऍश्टन अगर, जोश हेझलवूड, कॅमरून ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा, मिचेल स्टार्क, सीन ऍबॉट. (australian cricketer glenn maxwell and his wife vini raman blessed with a baby named logan maverick maxwell)

हेही वाचा-
भारताची विश्वचषकातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘यंदा World Cup Trophy आपलीच’
‘संपूर्ण जग पाकिस्तानला…’, Asia Cup 2023मधून PAK संघ बाहेर पडताच कडाडला शोएब अख्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---