---Advertisement---

ऑस्ट्रेलियन अष्टपैलूच्या आयुष्यात ‘दुहेरी आनंद’, टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर प्रेयसीसोबत साखरपुडा

On: रविवार, सप्टेंबर 12, 2021 12:22 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याने नुकताच त्याची प्रेयसी ग्रेटा मॅक हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. मिशेलने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून त्याची होणारी पत्नी ग्रेटासोबतचा एक फोटो शेअर करत चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. ग्रेटा आणि मिशेल हे मागच्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर आता त्यांनी साखरपुडा केला आहे.

मार्शने शेअर केलेल्या फोटोत दिसत आहे की, दोघे कुठेतरी नदी किनारी बसले आहेत आणि ग्रेटा सेल्फी घेत आहे. फोटोत मार्शने तिच्या गळ्यात हात टाकलेला दिसत आहे. ग्रेटा सेल्फी घेत तिच्या हातातील साखरपुड्याची अंगठी दाखवत आहे आणि दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. चाहत्यांना या दोघांचा फोटो आवडला असून सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.

मार्शला या आनंदाच्या क्षणी त्याचे संघातील सहकारी मार्कस स्टाॅयनिस, पॅट कमिंस, ग्लेन मॅक्सवेल, जेसन राॅय, एलेक्स कॅरी यांच्यासह इतरही क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CTrGaw0JTu0/?utm_source=ig_web_button_share_sheet

मार्श सध्या त्याच्या फार्ममध्ये आहे आणि तो आगामी टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघामध्ये निवडला गेला आहे. आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्याने नुकत्याच वेस्टइंडीजविरुद्ध पार पडलेल्या दौऱ्यात चांगले प्रदर्शन केले होते. त्याने या दौऱ्यातील टी२० मालिकेतील पाच सामन्यांमध्ये तीन अर्धशतक झळकावले होते. असे असले तरीही, ऑस्ट्रेलिया संघ मालिकेत १-४ अशा फरकाने पराभूत झाला होता.

मात्र मार्शच्या खेळीचे सर्वांनीच कौतुक केले. त्याने मालिकेतील पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. तसेच त्याने मालिकेतील चौथ्या सामन्यात ३ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याव्यतिरिक्त तो बांग्लादेशविरुद्ध टी२० मालिकेतही संघाचा भाग होता आणि चांगले प्रदर्शन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

झिम्बाब्वे संघाची अविश्वसनीय कामगिरी, अवघ्या १२ चेंडूंमध्ये जिंकला आंतरराष्ट्रीय टी२० सामना

हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार

आले रे आले, मुंबईकर आले! कर्णधार रोहितसह बुमराह आणि सूर्यकुमारची युएईत एन्ट्री- VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---