क्रिकेटर्स त्यांच्या मोठमोठ्या आलिशान घरांसाठी ओळखले जातात. ते जसे आलिशान बंगले विकत घेतात तसेच विकतात सूद्धा. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टीव्ह स्मिथने (steven smith sold bunglow) त्याचा सिडनी शहरातील एक बंगला विकला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल १२.३८ मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर एवढी आहे. भारतीय किंमतीनुसार ही रक्कम ६७ कोटी एवढी आहे.
चार बेडरुम, तीन बाथरुम असलेला हा बंगला स्मिथने दोन वर्षांपुर्वी विकत घेतला होता. या बंगल्याच्या लिलावात ४ वेगवेगळ्या कंपन्यांनी भाग घेतला होता. या लिलावाची सुरुवात ११.५० ऑस्ट्रेलियन डॉलरने झाली होती. अखेर हा आकडा १२.३८ मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरवर येऊन थांबला. याच बंगल्याची किंमत त्याने दोन वर्षांपुर्वी खरेदी केलेल्या किमतीच्या जवळपास दुप्पट आहे.
(ही बातमी ६० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)






