ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ट्रेविस हेड सध्या चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाच्या वनडे चषक स्पर्धेत त्याने आक्रमक अंदाजात फलंदाजी करत द्विशतक झळकावले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना क्विन्सलँडविरुद्ध अवघ्या १२७ चेंडूंचा सामना करताना त्याने २३० धावांची मॅरेथॉन खेळी केली आहे. या खेळीदरम्यान ८ खणखणीत षटकार आणि २८ चौकार ठोकले आहेत. त्यातीलच त्याने मारलेला एक षटकार सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.
दक्षिण ऑस्ट्रेलियाचा संघाचा कर्णधार ट्रेविस हेड हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. डावातील ४३ व्या षटकात तो १९० धावांवर फलंदाजी करत होता. यावेळी गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या क्लिन्सलँडच्या मॅथ्यू कुहनेमनने एक खराब चेंडू टाकला. त्याच्या या चेंडूचा बरोबर अंदाज घेत ट्रेविस हेडने पुढे सरसावत खणखणीत शॉट मारला आणि चेंडू थेट स्टेडियमबाहेरील रस्त्यावर जाऊन पडला. गंमतीची बाब म्हणजे, यावेळी रस्त्यावरुन फेरफटका मारत असलेल्या एका व्यक्तीने अगदी अचूक त्याचा चेंडू पकडला. त्याच्या अप्रतिम झेलचे अगदी सामना समालोचकानींही कौतुक केले.
Head launches it over mid wicket and it's a great catch beyond the rope!
Watch the #MarshCup live: https://t.co/cQ18WHYccI pic.twitter.com/42a7FdFNaX
— cricket.com.au (@cricketcomau) October 13, 2021
दरम्यान ट्रेविस हेडने अवघ्या ११४ चेंडूंमध्ये त्याचे द्विशतक पूर्ण केले होते. त्याने मारलेल्या चौकार षटकारांच्या जोरावरच त्याने तब्बल १६० धावा जोडल्या. तर उर्वरित धावा त्याने पळून काढल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर दक्षिण ऑस्ट्रेलियाने ४८ षटकांमध्ये ८ बाद ३९१ धावा केल्या होत्या. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या ३४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विन्सलँडकडून सलामीवीर सॅम हिज्लेट यानेही ९३ धावा फटकावल्या. तर मॅट रेनशॉ (५२ धावा) आणि मिचेल नासिर (५५ धावा) यांनीही अर्धशतक ठोकले. परंतु त्यांचा संघ ४१ षटकांमध्ये ३१२ धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे दक्षिण ऑस्ट्रेलियाने ६७ धावांनी हा सामना खिशात घातला.
ट्रेविस हेडला त्याच्या मॅरेथॉन खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमधील नवीन संघांच्या बोली लावण्यासाठी बीसीसीआयने वाढवलीय मुदत, पाहा काय आहे तारिख
युएईतून आली मोठी बातमी; संजू सॅमसन खेळणार टी२० विश्वचषक?
तब्बल ३ वेळा ‘या’ दिग्गजाने भारताच्या प्रशिक्षकपदासाठी केलाय अर्ज, यंदाही दाखवलीय उत्सुकता; पण…