ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे यावर्षी मार्च महिन्यात निधन झाले. कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. त्याच्या अकाली निधनानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मेलबर्न येथील कसोटीत त्याला एक खास पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. बॉक्सिंग डे दिवशी सुरू होणाऱ्या या कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू फ्लॉफी हॅट म्हणजेच गोल हॅट परिधान करतील. वॉर्न हा त्याच्या कारकिर्दी दरम्यान नेहमीच अशा प्रकारची हॅट वापरताना दिसत. यासोबतच खेळपट्टीच्या बाजूला देखील त्याचा कॅप क्रमांक 350 हा रंगवला जाईल.
यासोबतच तो बॉक्सिंग डे कसोटीत नेहमी शानदार कामगिरी करताना दिसला होता. 1994 मध्ये त्याने बॉक्सिंग डे कसोटीतच पहिली हॅट्रिक मिळवली होती. तर, 12 वर्षानंतर बॉक्सिंग डे कसोटीतच त्याने आपला 700 वा कसोटी बळी मिळवलेला.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया चे प्रमुख निक हॉकली यांनी, शेन वॉर्न हा क्रिकेट पुढच्या पिढीत पोहोचवणारा एक आयकॉन असल्याचे म्हटले. त्यामुळे त्याच्या घरच्या मैदानावर त्याच्या आवडीच्या बॉक्सिंग डे कसोटीत त्याचा सन्मान करणे आनंददायी गोष्ट असल्याचे सांगितले.
वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी 145 कसोटी सामने खेळले आणि 708 बळी घेतले. त्याचबरोबर या अनुभवी लेगस्पिनरने वनडेमध्ये 194 सामने खेळले असून, 293 बळी घेतलेले आहेत. वॉर्न हा 1999 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. वॉर्न त्याच्या खेळासाठी जितका प्रसिद्ध झाला तितकाच तो वादांमुळे चर्चेत राहिलेला.
(Australian Cricketera Wore Floppy Hat In Boxing Day Test For Shane Warne)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या ‘व्हाईटवॉश’ जखमेवर या क्रिकेट संघाने चोळले मीठ! ट्वीटमध्ये लिहिले, ‘आम्ही पराभवास…’
पाकिस्तानचा डब्ल्यूटीसीमधून खेळ खल्लास, ‘हे’ चार संघ अजूनही गाठू शकतात फायनल