---Advertisement---

मिस यू किंग! वॉर्नच्या जाण्याने दुःखात बुडाले संघसहकारी

On: शुक्रवार, मार्च 4, 2022 10:17 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फिरकीपटू शेन वॉर्न याने शुक्रवारी (४ मार्च) अखेरचा श्वास घेतला. हार्ट अटॅकमुळे थायलंड येथे त्याचे आकस्मित निधन झाले. तो ५२ वर्षांचा होता. आपल्या फिरकीच्या तालावर जगभरातील फलंदाजांना नाचवणाऱ्या वॉर्नला क्रिकेटविश्वातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्याच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियन संघातील त्याच्या संघसहकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली.

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक व वॉर्नचा संघ सहकारी ऍडम गिलख्रिस्टने ट्विटरवर केवळ ‘हार्ट ब्रेक इमोजी’ टाकत आपले दुःख व्यक्त केले.

अनेक वर्ष शेन वॉर्न सोबत ऑस्ट्रेलियन संघाच्या फिरकीची जबाबदारी सांभाळणारा ब्रॅड हॉग दुःख व्यक्त करताना भावूक झाला. त्याने ट्विट करत लिहिले,

‘तू राजासारखे आयुष्य जगला. तुझ्यासारख्या सूर्याची सावली होता आले. मी स्वतःला भाग्यवान समजतो.’

तसेच, ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार पॅट कमिन्स याने ट्विट करत लिहिले,

‘हे पचवण्यासाठी अत्यंत जड जात आहे. त्याचा खेळ पाहून आम्ही मोठे झालो. ‌जगभरातील सर्व क्रिकेटपटू जाणतात त्याने क्रिकेटला काय दिले. त्याने क्रिकेटचा चेहरा बदलला. श्रद्धांजली राजा!’

याव्यतिरिक्त अनेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली.

महत्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग.! ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन, क्रिकेटविश्व हादरले (mahasports.in)

बिली बाऊडेन यांनी खास शैलीत बोट उंचावले अन् शेन वॉर्नचे नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले (mahasports.in)

बरोबर २९ वर्षांपूर्वी २३ वर्षांच्या शेन वाॅर्नने टाकला होता ‘बाॅल ऑफ द सेंच्युरी’, पाहा तो खतरनाक चेंडू (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---