भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ब्रिस्बेन कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत होते. अशा दबावाच्या परिस्थितीत देखील भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत 3 गडी राखून सामना जिंकला. भारताच्या या मालिका विजयानंतर देशभरातून सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला जात आहे. अशातच ऑस्ट्रेलियाच्या एका समर्थकाचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये तो वंदे मातरमचा नारा देताना दिसत आहे.
सोशल मिडियात वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाची जर्सी घातलेला एक व्यक्ती स्टेडियममध्ये उभा राहून ,”भारत माता की जय. वंदे मातरम”, असे नारे देताना दिसत आहे .सोशल मीडियावर अनेक भारतीय चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत या ऑस्ट्रेलियन फॅनच्या खेळ भावनेचे कौतुक केले आहे.
दरम्यान हे जाणून घेणे गरजेचे आहे की या व्हिडिओबद्दल अजून कुठलीही स्पष्टता समोर आलेली नाही की, नक्की हा कधीचा आणि कोणत्या स्टेडियमवरील आहे.
@CricFansWorld @BCCI @HCICanberra @anirbanganguly @UttamKu84140085 @virendersehwag @bhogleharsha some extraordinary love for India at display at the Gabba this year.😊😊 pic.twitter.com/lAoqTza3Cd
— Dr Ashutosh Misra (@ashutoshmisra70) January 18, 2021
#India वाले हैं, खेल के साथ दिल भी जीतेंगे!😎
Feel the Goosebumps.
Some heart warming moments in Australia after #IndVsAus match.
VC- Social Media.#AUSvsIND #GabbaTest #TeamIndia @cricketaakash pic.twitter.com/XT7FklQjO7— Dipanshu Kabra (@ipskabra) January 19, 2021
https://twitter.com/CricFansWorld/status/1351036600839499776
सामन्याचा विचार केला असता , पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 3 गडी राखत विजय मिळवला. भारताकडून पाचव्या दिवशी स्टार ठरला तो यष्टीरक्षक रिषभ पंत, सलामीवीर शुभमन गिल आणि कसोटीपटू चेतेश्वर पुजारा. पंतने आक्रमक 89 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यापूर्वी पहिल्या सत्रात शुभमन गिलने शानदार 91 धावांची तर पुजाराने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार अजिंक्य व संपूर्ण संघाचे कौतुक केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“शब्दात भावना व्यक्तच होऊ शकत नाही” टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रहाणे खुष
भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाच्या चर्चेपुढे ‘हा’ मालिकावीर दुर्लक्षितच!