---Advertisement---

टीम इंडियाच्या विजयाने गुगल बाबाही खुश! ऑनलाईन फटाके फोडत क्रिकेटप्रेमींना मोठं सरप्राईज

On: बुधवार, जानेवारी 20, 2021 1:40 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघासाठी मंगळवारचा(१९ जानेवारी) दिवस ऐतिहासिक ठरला. मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाने ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाची धूळ चारली. एवढेच नाही तर सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. या ऐतिहासिक विजयानंतर जवळपास प्रत्येक भारतीयाने जल्लोष केला. अनेकांच्या म्हणण्यानुसार हा विजय दिर्घकाळासाठी सर्वांच्याच स्मरणात राहिल आणि या विजयाची आठवण सातत्याने काढली जाईल. अशा या खास आणि मोठ्या विजयाचे सेलिब्रेशन गुगलकडूनही करण्यात येत आहे.

बुधवारी(२० जानेवारी) गुगल इंडियाने भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने केले. गुगल इंडियावर ‘ind vs aus’, ‘aus v ind’ किंवा ‘India National Cricket Team’ असे सर्च केल्यावर गुगलच्या सर्च रिझल्टमध्ये फटाके उडताना दिसत आहेत.

याबाबत गुगल इंडियाने ट्विट करत स्पष्ट केले की ‘तुम्ही अजूनही भारताचा विजय साजरा करत आहात का? आम्ही पण करतोय. सरप्राईज पाहाण्यासाठी  ‘India National Cricket Team’ असे सर्च करा.’

ब्रिस्बेन कसोटी विजय – 

ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या ३२ वर्षात कधीही ब्रिस्बेन येथील गॅबा स्टेडियमवर पराभूत झाला नव्हता. पण भारतीय संघाने अखेर गॅबाचा अवघड किल्लाही सर केला आणि ऑस्ट्रेलियाला ३२ वर्षांनंतर गॅबावर पराभूत करण्याची कामगिरी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सामन्याच्या ५ व्या दिवशी रिषभ पंत(८९*), शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजारा (५६) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पुर्ण केले.

सलग दुसरा मालिका विजय

भारत या मालिकेत ऍडलेड येथे झालेला पहिला सामना पराभूत झाला होता. पण त्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन करत मेलबर्न येथील दुसरा सामना जिंकला. त्यानंतर तिसरा सामना सिडनी येथे झाला. हा सामना भारताने अनिर्णित राखण्यात यश मिळवले आणि अखेर ब्रिस्बेन येथे ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे ही मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली.

हा भारताचा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा कसोटी मालिका विजय ठरला. याआधी २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारताने कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

वंदे मातरम! ब्रिस्बेन कसोटी विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ फॅनचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

“शब्दात भावना व्यक्तच होऊ शकत नाही” टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रहाणे खुष

“आम्ही गाबामध्ये मालिका विजयासाठी आलो होतो, पण भारतीय संघाने…”, ब्रिस्बेन कसोटीनंतर ऑसी कर्णधार टिम पेनची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---