बुधवारी (०८ सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच याच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी एमी फिंच हिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. फिंचने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन यासंबंधी माहिती दिली आहे. त्याने त्याची पत्नी आणि नवजात मुलीसोबतचा आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या मुलीचे नावही घोषित केले आहे.
फिंच सध्या त्याची पत्नी एमीसोबत मेलबर्नमध्ये आहे. मेलबर्नमधील सेंट विन्सेंट या खाजगी रुग्णालयातच त्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिला आहे. फिंच आणि एमीने त्यांच्या मुलीचे नाव ‘इस्थर केट फिंच’ असे ठेवले आहे.
फिंचने इंस्टाग्रामवरुन आपल्या मुलीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘या जगात तुझे स्वागत आहे इस्थर केट फिंच. काल संध्याकाळी (०७ सप्टेंबर) ४ वाजून ५८ मिनिटांना इस्थरचा जन्म झाला आहे. तिचे वजन ३.५४ किलोग्राम आहे. आई एमी आणि इस्थर दोघीही स्वस्थ आहेत.’
फिंचने शेअर केलेल्या फोटोंपैकी पहिल्या फोटोत चिमुकल्या इस्थरला फुलांची प्रिंट असलेल्या कपड्यांनी गुंडाळलेले दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत इस्थरसह फिंच आणि एमी दोघेही दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CTjRgq-FMgp/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान फिंच सध्या गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्याला ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी गुडघ्याची दुखापत झाली होती. यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले होते. ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर त्याने आपल्या गुडघ्याची सर्जरी केली आहे. येत्या टी२० विश्वचषकापूर्वी दुखापतीतून बरे होण्याकडे त्याचे लक्ष असेल.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषकाचे सामने खेळले जाणार आहेत. अद्याप ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकासाठी त्यांचा संघ जाहीर केलेला नाही. तत्पूर्वी फिंचला फिटनेस चाचणी द्यावी लागली व त्यात उत्तीर्णही व्हावे लागेल. त्यानंतरच त्याला टी२० विश्वचषकासाठी संघात जागा मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
दे घुमा के! हार्दिक परतला जुन्या रंगात, सराव सत्रात ठोकला खणखणीत ‘हेलिकॉप्टर शॉट’
ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतरही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ २ बदलांंची आवश्यकता
तूच रे तूच! पाण्याची बाटली पायाजवळ पडलेली असूनही रूटचं दुर्लक्ष, पण कोहलीने जिंकली कोट्यावधी मने