भारतीय संघाला आशिया चषक 2023 संपल्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. 22 सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी रविवारी (17 सुप्टेंबर) ऑस्ट्रेलियाने आपला संघ घोषित केला. आगामी वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिकेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
Australian ODI squad vs India:
Pat Cummins (C), Abbott, Carey, Ellis, Green, Hazlewood, Inglis, Spencer Johnson, Labuschagne, Mitchell Marsh, Maxwell, Sangha, Matt Short, Smith, Starc, Stoinis, Warner, Zampa pic.twitter.com/5ipyykcVsC
— Johns. (@CricCrazyJohns) September 17, 2023
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ –
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, सिन ऍबॉट, ऍलेक्स केरी, नेथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोस इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, ऍडम झाम्पा.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या वनेड मालिकेचा विचार केला, तर पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना 24 सप्टेंबर रोजी इंदोरमध्ये, तर तिसरा सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये पार पडेल. आगामी वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. वनडे विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांच्या सरावासाठी ही वनडे मालिका महत्वाची ठरेल. तसेच दोन संघांतील कोणती बाजू अधिक भक्कम आहे, याचा अंदाजही येऊ शकतो.
वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. विश्वचषक संपल्यानंतरदेखील ऑस्ट्रेलियन संघ भारतातून जाणार नाही. उभय संघांमध्ये 23 नोव्हेंबर रोजी पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. या मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबर रोजी खेळला जाईल.
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
तिशीतील दिग्गजाचा घरच्या मैदानावरील वनडे करिअरचा शेवटचा सामना; म्हणाला, ‘माझं शरीर म्हणतंय मी 40चा…’
रोहितने संघाबाहेर केलेल्या खेळाडूंना घेऊन दिग्गजाने निवडली Playing 11, Asia Cup Finalपूर्वी बातमी वाचाच