---Advertisement---

ब्रेकिंग: तृतीय मानांकित दिमित्रोव्हला पराभूत करत बिगरमानांकीत एडमंड ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीत

---Advertisement---

मेलबर्न । ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तृतीय मानांकन मिळालेल्या बेल्जीयमच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला उपांत्यफेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला ब्रिटनच्या काईल एडमंडने 6-4 3-6 6-3 6-4 असे ४ सेटमध्ये पराभूत केले आहे.

आज सकाळच्या सत्रात झालेल्या या सामन्यात दिमित्रोव्हला दुसरा सेट सोडून अन्य कोणत्याही सेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. दिमित्रोव्हकडे या स्पर्धेच्या संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते.

काईल एडमंड सध्या एटीपी क्रमवारीत ४९व्या स्थानावर आहे. या विजयामुळे तो कमीतकमी एटीपी क्रमवारीत २५व्या स्थानी येऊ शकतो. ओपन इरामध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीत प्रवेश करणारा केवळ ६वा खेळाडू ठरला आहे.

अँडी मरे, ग्रेग रुसेडस्की, जॉन लॉईड, रॉजर टेलर आणि टीम हेंमन हे खेळाडू यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीत पोहचले आहे.

१९७७पासून अँडी मरे सोडून ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्यफेरी गाठणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

तो आता अँडी मरे आणि आणि मारिन चिलीच यांच्यातील विजेत्या खेळाडूशी उपांत्यफेरीत लढणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment