---Advertisement---

ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी मोठा वाद! अव्वल मानांकित जोकोविचला विमानतळावरच रोखले

On: गुरूवार, जानेवारी 6, 2022 11:29 PM
djokovich
---Advertisement---

जगभरात कोरोनानाचा प्रसार पुन्हा वाढत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा ऑस्ट्रेलिया ओपन २०२२ (australia open 2022) चे आयोजन केले गेले आहे. ही स्पर्धा १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक मोठा वाद समोर आला आहे. जगातील सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक नोवाक जोकोविच (novak djokovic) याचा वीजा रद्द केला गेला आहे. जोकोविच बुधवारी ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मेलबर्नमध्ये पोहोचला, पण त्याला विमानतळाच्या बाहेर जाण्याची परवानगी मिळाली नाही.

मेलबर्न विमानतळावर पोहचल्यानंतर जोकोविचला आधी काही तास त्याठिकाणी वाट पाहावी लागली आणि नंतर देशात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नसल्यामुळे त्याचा वीजा रद्द केला गेला. असे माहिती समोर आली आहे की, यावेळी जोकोविचकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र नव्हते. जोकोविच कोरोना लसींच्या प्रमाणपत्राविना स्पर्धेत भाग घेणार होता.

तत्पूर्वी, वीजा रद्द करण्याच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाकडून जोकोविचला लसीकरणाच्या नियमातून सूट दिली गेली होती आणि स्पर्धेत भाग घेऊ शकतो, असे सांगितले गेले होते. परंतु, नंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पत्रकार परिषद घेऊन कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचे सांगितले आणि कोणीच कायद्याच्या वर नाही. अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत की, जोकोविच देखील ऑस्ट्रेलिया सरकारच्या या नियमांना आव्हान देऊ शकतो.

मॉरिसनने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट केले की, “जोकोविचचा वीजा रद्द केला गेला आहे. नियम नियम आहेत. विशेषतः जेव्हा आमच्या सीमांची गोष्ट असते. कोणीच या नियमांच्या वर नाहीये. आमचे सीमेविषयीचे कडक नियम ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचे राहिले आहेत. कोरोनामुळे जगात सर्वात कमी मृत्यूदर याच ठिकाणी आहे. आम्ही सतर्क राहणे पुढेही कायम ठेवत आहोत.”

दुसऱ्या बाजूला सर्बियाचे राष्ट्रपति अलेक्जेंडर वूसिक यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून लिहिले की, “मी जोकोविचसोबत फोनवर चर्चा केली आहे आणि संपूर्ण सर्बिया त्याच्यासोबत आहे. आमचे अधिकारी जगातील सर्वश्रेष्ठ टेनिस खेळाडूसोबत होणारा दुर्व्यवहार लवकरात लवकर संपण्याचा सर्व प्रयत्न करत आहेत. सर्बिया आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अंतर्गत जोकोविचच्या न्याय आणि खरेपणासाठी लढणार.”

दरम्यान, जोकोविचच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत सर्वाधिक २० वेळा ग्रँड स्लॅम जिंकले आहे. जोकोविचप्रमाणेच रोजर फेडरर आणि राफेल नडाल यांनीही प्रत्येकी २० ग्रँड स्लँम जिंकले आहेत. आगामी स्पर्धेत सहभाग घेऊन जोकोविच २१ वे ग्रँडस्लॅम जिंकून विश्वविक्रम करण्याच्या प्रयत्नात असेल.

महत्वाच्या बातम्या –

कोरोनामुळे भारतीय देशांतर्गत स्पर्धा स्थगित; बीसीसीआय अध्यक्ष गांगुली म्हणाले, ‘आयोजनासाठी सर्वकाही करू’

यजमान ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीत फ्रंटफूटवर; पुनरागमनात ख्वाजाचे दणदणीत शतक

लेकीच्या वाढदिवशी सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी विराटची जोरदार तयारी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

व्हिडिओ पाहा –

डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत । What Is VJD Method Of Cricket?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---